Home महाराष्ट्र पत्रकाराच्या विविध मागण्यासाठी पुसद व्हॉइस ऑफ मीडियाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पत्रकाराच्या विविध मागण्यासाठी पुसद व्हॉइस ऑफ मीडियाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

144

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पूसद(दि.28ऑगस्ट):-व्हॉइस ऑफ मीडिया पुसद यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी तथा दंड अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्यामार्फत पत्रकाराच्या विविध मागण्याचे निवेदन २८ ऑगस्ट रोजी सादर केले आहे.माध्यमाकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते मात्र माध्यमाचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत म्हणून व्हाँईस ऑफ यांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन दिले आहे.

ज्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे.राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे.जसे की बार कौन्सिल वकिलांना वकिली करण्याचा अधिकृत परवाना देते तसे पत्रकार असल्याचा अधिकृत परवाना मिळावा.राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिक यांना जाहिराती देताना सातत्याने डावलण्याचा प्रकार पुढे आला आहे. तो प्रकार थांबून त्यांना जाहिराती देण्यात याव्यात. सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष तातडीने तयार करावेत. तसा शासन निर्णय काढावा. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. त्या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकार, त्यांच्या पाल्यांना व्यवसायासाठी मदत करण्यात यावी. याबाबत सरकारने आपल्याकडे जी माहिती मागविली आहे ती तातडीने द्यावी.

माहिती महासंचालनालय यांच्या वतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहित करणारे पुरस्कार गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत, ते देण्यात यावे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन २० हजार रुपये करू, अशी घोषणा केली होती. टीव्ही, रेडियो आणि सोशल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली, या दोन विषयांचा जीआर तातडीने काढावा.अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन याबाबत असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. त्याबाबत कमिटी नेमून ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव रखडले आहेत, ते मार्गी लावावेत.

सर्व ठिकाणी वेगाने वाढणाऱ्या आणि भविष्यात पत्रकारितेची नांदी असणाऱ्या सोशल मीडिया पत्रकारितेसाठी तातडीने जाहिरातींबाबत पॉलिसी बनवावी. सोशल मीडियांनाही जाहिराती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.ज्यांनी पत्रकारितेत किमान दोन वर्ष पूर्ण केली आहेत, अशा प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधीच्या सूचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमाच्या मालकांना देण्यात याव्यात.सरकार आणि राज्य कामगार विभाग यांना या सूचनांचे पालन काटेकोर करण्याबाबत मार्गदर्शिका द्यावी.असे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनावर व्हाँईस आँफ मिङियाचे पुसद तालुकाध्यक्ष समाधान केवटे,कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, उपाध्यक्ष दिनेश खांडेकर. मंगेश पारटकर, कार्याध्यक्ष मदन बडगुजर,सरचिटणीस शंकर माहुरे, सहरचटणीस प्रा. अंबादास वानखेडे कार्यवाहक यशवंत जाधव, संघटक रवी खरात, प्रसिद्ध प्रमुख अरुण बरडे,सदस्य अरविंद कांबळे, अविनाश आखरे, पुरुषोत्तम सोडगीर, गुलाब वाहुळे, नंदकिशोर बंग, विजय चव्हाण रविकांत सिंगणकर,प्रा. एस. एल. राठोड, कुलदीप सुरोशे, यांच्या स्वाक्षरी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here