🔺गेवराई तालुक्यातील घटना
✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.28ऑगस्ट):-शहरातील रंगार चौक याठिकाणी रहिवासी असलेल्या एका 36 वर्षीय तरूणाचा खून झाला असल्याची घटना (दि 28 रोजी) सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर गेवराई शहरात खळबळ उडाली. परंतु यांचा खून झाला असल्याची बाब तपासात समोर आली आहे. तसेच मयताच्या भावाने इतर लोकांच्या मदतीने आपल्या सख्या भावाची हत्या केली असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनोहर विलास पुंड (वय 36 वर्ष, रा. रंगारचौक गेवराई) असे या खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. आज (दि. 28) सकाळी शहरालगतच्या बागवान कब्रस्थान परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये या तरूणाचा सशंयास्पद अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. उत्तरीय तपासणीनंतर हा खून असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी मयत तरुणाचा भाऊ दर्शन विलास पुंड (वय 31) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्याने सांगितले की माझा भाऊ याने अनेक लोकांकडून पैसे घेतले होते, तसेच तो दारू पिऊन घरी येऊन नेहमी त्रास देत असे.त्यामुळे त्याला वैतागून दर्शन याने याबाबतची माहिती माऊली आनंद बाप्ते (वय 30 वर्ष, रा. रंगारचौक) याला दिली. बाप्ते याच्यासह अन्य तिन साथीदारांच्या मदतीने बागवान कब्रस्थान परिसरातील एका शेडमध्ये नेऊन त्याला अमानुष मारहाण केली. त्यानंतर त्याचा खून केला अशी कबूली मनोहर याचा भाऊ दर्शन याने पोलिसांना दिली.
तसेच गेवराई पोलीस ठाण्याचे पो.हे. उगलमुगले यांच्या फिर्यादीवरून दर्शन विलास पुंड, माऊली आनंद बाप्तेसह इतर तिन जणांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तूकाराम बोडके हे करत आहेत .