✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.28ऑगस्ट):-बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक २७ आगस्ट २०२३ ला मातोश्री सभागृह, तुकुम, चंद्रपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि थाटात संपन्न झाले. फेडरेशनचे अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधी सहभागी झाले होते. सदर अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्राचे उद्घाटन नागपुर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.
या प्रथम सत्राच्या अध्यक्षस्थानी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.डॉ. चरणदास सोळंके हे होते तर स्वागताध्यक्ष म्हणून चंद्रपूर येथील सुप्रसिध्द मानसिक रोग तज्ञ डॉ.विवेक बांबोळे होते.सर्व प्रथम बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक स्मृतीशेष श्रीकृष्ण उबाळे साहेब यांच्या स्मृतींना तसेच समता सैनिक दलाचे केंद्रीय स़ंघटक एल.आर.बाली साहेब, प्रख्यात लोककलावंत गदर, पुरोगामी विचारवंत प्रा.हरी नरके यांच्या दुःखद निधनाबद्दल सभागृहाने दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगतांना आदरांजली वाहण्यात आली.
तसेच बहुजन समाजाला जागृत करणारे महापुरुष महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रतिनिधी सत्राला बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव पी. एच. गवई (बुलढाणा), राष्ट्रीय कोषाध्यक्ष हर्षद सोनोने (अमरावती), स़ंस्थापक सदस्य सिद्धार्थ डोईफोडे (पुलगांव जिल्हा वर्धा), रामप्रभू सोनोने (वाशिम), राज्याचे कोषाध्यक्ष प्रा.अशोक ठवळे (वरूड), राज्याचे उपाध्यक्ष चैनदास भालाधरे (कोराडी),एड.एकनाथ रामटेके (औरंगाबाद), देवराव भगत (हिंगोली), एड.इंद्रजीत मेश्राम (नागपुर), प्रमोद पाटील (हिंगणघाट) सुधाकर वासे (अकोला), प्राचार्य सुर्यकांत खनके (चंद्रपूर), दिनकर मडकवाडे (यवतमाळ)इत्यादी मान्यवर मंडळींनी उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन केले . या प्रतिनिधी सत्राचे प्रास्ताविक संघटनेचे राज्याचे संघटन सचिव प्रा.शेषराव रोकडे यांनी तर सूत्रसंचालन संघटनेचे राज्याचे महासचिव प्रा.डॉ. रविंद्र महींदकर यांनी केले.
दुसऱ्या खुल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजकुमार जवादे हे होते.यात भारतीय संविधानाची वर्तमान स्थिती व आव्हाने तसेच जातीनिहाय जनगणना व जाती अंताचा लढा आणि संविधानातील धोरणे:एक विश्लेषण या दोन विषयांवर बंगलोर येथील सुप्रसिध्द विचारवंत लोकेश नाईक, मुंबई येथील आयकर आयुक्त आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे राष्ट्रीय प्रचारक अरविंद सोनटक्के, नागपुर येथील भदंत धम्मसारथी, आवाज इंडिया या टि. व्हि. च्यानलचे स़ंचालक प्रितम बुलकुंडे, यवतमाळ येथील रिपब्लिकन विचारवंत रमेश जीवने इत्यादी मान्यवरांनी या विषयावर उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.आज भारतीय संविधान धोक्यात आले आहे येथील प्रस्थापित राज्यकर्त्यांना संविधान मान्य नाही. म्हणुन स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यावर आधारित फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या लोकप्रतिनिधींना संसदेत आणि विधानसभेत पाठविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सर्व वक्त्यांनी व्यक्त केले.
या खुल्या सत्राचे प्रास्ताविक बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ.प्रा.टी.डी.कोसे यांनी,संचालन संघटनेचे वरिष्ठ कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नागपुर प्रदेशाचे सचिव सिद्धार्थ सुमन यांनी तर आभारप्रदर्शन संघटनेचे बल्लारपूर तालुक्याचे सचिव निलेश गोरघाटे यांनी केले.याप्रसंगी मंचावर समता सैनिक दलाचे केंद्रीय कोअर कमिटीचे अध्यक्ष अशोक टेंभरे,आल इंडिया समता सैनिक दलाचे चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष अनंत बाबरे, बाबासाहेब आंबेडकर न्याशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्सचे चंद्रपूर जिल्हा सचिव किशोर सवाने, डॉ बाबासाहेब आंबेडकर लायर्स असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष एड.पुनमचंद वाकडे, जिल्हा शासकीय रुग्णालय चंद्रपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ बंडू रामटेके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रा.नागसेन शंभरकर, डॉ.प्रा.संजय रामटेके, डॉ.प्रा.विजय सोमकुंवर,प्रा.भाऊराव मानकर, दिपक जुमडे, संजय खोब्रागडे,संजय साखरे, नवनाथ देरकर, नितिन गेडाम, मुन्ना आवळे, दिलीप परकारे, जयंत गाडगे, नितिन वाढई इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतलेत.