Home महाराष्ट्र UDIDकलर प्रिंट ग्राह्य परिपत्रक निर्गमित केल्याबद्दल खामगाव आगार अधिकाऱ्यांचा विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशनच्यावतीने...

UDIDकलर प्रिंट ग्राह्य परिपत्रक निर्गमित केल्याबद्दल खामगाव आगार अधिकाऱ्यांचा विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशनच्यावतीने सत्कार

165

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगाव(दि.28ऑगस्ट):-संपूर्ण राज्यभरात दिव्यांग अधिनियम 2016 नुसार आणि भारत सरकार द्वारे निर्गमित रुग्णालयातील सक्षम वैद्यकिय अधिकारी तपासणी करुन हे दिव्यांग प्रमाणपत्र व युनिक डीझ्याबिलिटी म्हणजे युडीआयडी कार्ड सर्व बाबी तपासत २१ प्रकारचे असलेल्या दिव्यांगांना प्राप्त होत असते.या मध्ये तांञीक बाबीमुळे युडिआयडी कार्ड मिळण्यासाठी एक ते दोन वर्षाचा कालावधी जातो हे आॅनलाईन प्रिंटच्या सहाय्याने प्रवासाला अडचणी जात होत्या याबाबींची दखल विविध संघटना संस्था ज्यामध्ये खामगाव येथिल विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन दिव्यांग सेवाभावी संस्था नेही या रंगीत झेराॅक्स ग्राह्य धरावी याकरिता दिव्यांग आयुक्त व एसटी महामंडळाला वेळोवेळी मागणी निवेदन सादर केले होते त्याचे फलित म्हणुन सवलत क्र ३४१४ दि २८/०८/२०२३ रोजी परिवहन महामंडळाने स्वतंञ परिपञक निर्गमित करण्यात आले.

या मध्ये विविध दिव्यांगांना सवलती करिता युडिआयडी कार्ड ची रंगित झेराॅक्स ग्राह्य घरण्याचे स्पष्ठ आदेशित विविध विभागांना केले आहे हे परिपञक आज खामगाव येथे प्राप्त होताच विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन अध्यक्ष मनोज नगरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय अधिकारी डाॅ शिंदीकर यांच्या प्रमुख ऊपस्थितीत आगार व्यवस्थापक संदिप पवार ट्राफिक कट्रोलर मोहिनी पाटिल सरलाताई तिजारे यांचा पुष्पगुच्छ पेढा भरवुन सत्कार करण्यात आला.

दिव्यांग सेवक क्षञुघन ईंगळे यांच्यासह वसंत चिखलकर,शेखर तायडे,विठ्ठल कावस्कर,अनंता शिंगणे,दिलीप गांधी,शेखर तायडे,सुरेद्र चव्हाण रामभाऊ तळपते,ज्ञानेश्वर तायडे आदी दिव्यांग हजर होते तर आगार व्यवस्थापक संदिप पवार यांनी यावेळी सांगीतले कि आपल्या आगारातिल सर्व चालक वाहक व संबधितांना या परिपञकानुसार सर्व दिव्यांगांना सवलत देण्याची सुचना देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here