✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मोबा.9075686100
म्हसवड(दि.28ऑगस्ट):-दहिवडी ता.माण येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व युवक काँग्रेसच्या वतीने मान खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी दहिवडी येथील फलटण चौकात रास्ता रोको केला. यावेळी भाजपाविरोधी घोषणा दिल्याने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली व कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध केला.यावर माण भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी रणजितसिंह देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली.
यावेळी शिंदे म्हणाले की,आज दहिवडीत काँग्रेसच्या वतीने रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले ते शेतकरी हितापेक्षा स्वहितासाठी व स्वतःच्या आर्थिक तुंबडी भरण्यासाठीच केलेला खटाटोप केला असे म्हटले तरी वावग ठरणार नाही.
महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना काँग्रेसची पत वाढवण्यासाठी हा फार्स आहे.हरणाई सुतगिरणीच्या नावाखाली करोड रुपये लाटले आहेत. दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास शासन नक्कीच निर्णय घेईल परंतु केवळ राजकीय उंची वाढवण्यासाठी व आमदार जयकुमार गोरेंवर टीका करण्यासाठी रास्ता रोको केल्याचा आरोप त्यांनी केला. या तालुक्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे आमदार गोरे आहेत.
निष्क्रिय रणजितसिंह देशमुख यांनी आमदार गोरेंवर बोलताना भान ठेवावे तुमच्यासारखे माण खटाव मधील अनेक नेते एकत्र असतानाही २०१९ च्या विधानसभेला जनतेने आमदार गोरेंवर विश्वास ठेवला आहे. राजकीय अस्तित्व संपण्याच्या मार्गावर असलेल्यांनी आमच्या नेत्यांवर बोलू नये. माण खटाव च्या जनतेने आमदार जयकुमार गोरे यांच्या रूपाने हॅट्रिक आमदार देण्याचा इतिहास रचला आहे. कायमस्वरूपी पाणी,एमआयडीसी आली पाहिजे यासाठी आमदार गोरे यांनी कायम प्रयत्न केला आहे.माण खटाव तालुक्यात पाणी आले नाही असे म्हणणाऱ्यांचे डोळे तपासावे लागतील असेही श्री.शिंदे म्हणाले.