ब्रम्हपुरी(दि. 27 ऑगस्ट):-
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता असुन त्यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या आदर्श राज्याची उदाहरणे जगभरात दिली जातात. फक्त महाराष्ट्राच नाही तर जगभरात त्यांच्या कार्याची थोरवी गायली जाते. याच आदर्श राजाचे नाव ब्रम्हपूरी शहरातील अत्यंत महत्त्वाच्या व वर्दळीच्या असलेल्या आरमोरी रस्त्यावरील मुख्य चौकाला अनेक वर्षांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले होते.
मात्र अनेक वर्षांचा कालावधी लोटुनही या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचे सौजन्य कुणीच दाखवले नाही. ही बाब जनसामान्यांना न पटणारी आहे.
मात्र सदर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याची आग्रही मागणी घेऊन मनसेने आता शासन प्रशासनाला निवेदन दिले आहे.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पारटवार यांच्या नेतृत्वाखाली मनसे सैनिकांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन सात दिवसांत लेखी अथवा भ्रमणध्वनीद्वारे उत्तर सादर करावे अन्यथा मनसे सैनिक रास्तारोको आंदोलन करतील असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
निवेदन देतांना दिपक मेहेर, विष्णु हटवार, गोलु मेहेर, राकेश भानारकर, क्रिष्णा मेहेर, विशाल दिघोरे, प्रशांत उके, भरत मेश्राम, राजु शेंडे हे यावेळी उपस्थित होते.