सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100
म्हसवड : दहिवडी हे माण तालुक्यातील महत्वाचे शहर या शहरात महाविध्यालंय, आय. टी . आय. कॉलेज, आणि विद्यालये असून ग्रामीण भागातून विध्यार्थी शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी येत असतात ,विद्यार्थ्यांनी पासेस काढलेले आहेत परंतु एसटी वेळेवर येत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमात होत असून काही वेळा विध्यार्थ्यांना गाडीत घेतले जात नाही तर काही वेळा एसटी ची फेरी रद्द केली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा कॉलेज मध्ये पोहचता येत नाही त्यामुळे त्यांचे हाल होतात व शैक्षणिक नुकसान होते त्यामुळे दहिवडी एसटी आगाराने वेळेवर एसटी सोडाव्यात अन्यथा आंदोलन करणेत येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे दिला आहे
निवेदन देतेवेळी वंचित चे तालुका अध्यक्ष युवराज भोसले,जिल्हा युवा अध्यक्ष सनी तुपे,उपाध्यक्ष संतोष पारसे,सचिव अमर खरात,सहसचिव राजेंद्रआवटे ,अशोक पवार ,समाजसेवक अंकुश नामदास,सतीश शेंडगे,नसीर मुलाणी कार्यकर्ते उपस्थित होते