मुंबई, २६ ऑगस्ट २०२३
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सातारा जिल्ह्यातील शेंद्र गावापासून वाघवाडी फाटा दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अडाणी समुहाच्या वतीने डी.पी.जैन प्रा.लि या नागपूरच्या कंपनीला दिले आहे. पंरतु, रस्त्यासाठी लागणाऱ्या साहित्य बेकायदेशीर रित्या रॉयल्टी न भरता उत्खनन करून वापरे जात आहे, असा आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी केला. अडाणी समूह मार्फत डी.पी.जैन प्रा.लि ला देण्यात आलेले हे काम त्यामुळे तात्काळ बंद करण्याची मागणी पाटील यांनी शनिवारी केली.
रस्ता रुंदीकरणासाठी दुर्तफा वापरण्यात येणारा मुरूम, माती अथवा इतर साहित्य बेकारयदेशीर रित्या वापरल्याने कामाचा दर्जा निकृष्ट झाला आहे. अशात या मार्गाचे बांधकाम योग्य मापदंडाचे पालन करीत करण्यात आले आहे की नाही, मार्गाचा दर्जा तपासला पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली. क्रेशरच्या माध्यमातून खडी, दगड, माती, मुरूमाचा वापर करीत यासंबंधी कुठलीही मोजमाप नसल्याचा आरोप केला जात आहे. डी.पी.जैन कंपनीचे अधिकारी येथील कामाबाबत येजा करणार्या लोकांना दमदाटी करून दहशत माजवत असल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला.
अशात अडाणी समूहाने या कंपनीला रस्त्याचे काम देवून मोठी चुकी केल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. शासनाची योग्यरित्या परवानगी न घेता काम सुरू करण्यात आले आहे.बेकारयदेशीररित्या दहशत माजवून रस्त्याच्या रुंदीकरणासंबंधी आणि पुरवठा, निविदेप्रमाणे कामे सुरू नसल्याचा दावा पाटील यांनी केला. कंपनीकडून साताऱ्याचे खनिकर्म अधिकाऱ्यांची कुठलीही परवानगी रॉयल्टी बाबत घेण्यात आलेली नाही.अशात मुरूम, दगड आणि इतर साहित्य कुठून आणि किती प्रमाणात वापरे जात आहे, याची नोंदी नाही.
भ्रष्टाचाराने माखलेले या मार्गाचे काम त्यामुळे त्वरित बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा पाटील यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. पंरतु, अद्याप कुठलीही दखल घेण्यात आलेली नसल्याची खंत देखील पाटील यांनी व्यक्त केली. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि महसुल मंत्र्यांना रितसर पत्र पाठवले असून त्यांनी यासंबंधी दखल घ्यावी, अशी मागणी देखील पाटील यांनी केली.