✒️माऊली जहागीर(विशेष प्रतिनिधी)
स्थानिक केसरी नंदन सभागृहात वऱ्हाड विकासच्या वाचक मिळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज भूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड,प्रमुख अतिथी श्री संजय नागोने (अध्यक्ष अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी ) श्री बाळासाहेब पाचघरे (सर्व माळी समाज ऋणानुबंध परिचय महासंमेलनाचे संघटक)होते.
वऱ्हाड विकासाच्या विशेष अंकाचे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. ओबीसीच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारे ओबीसी नेते श्री संजय नागोने (माऊली जहागीर )यांचा मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.त्यांनी सर्व शाखीय ऋणानुबंध परिचय पुस्तक हे विवाहइच्छुकांना योग्य जोडीदार निवडीसाठी एकमेव प्रभावी माध्यम असल्याचे म्हटले.
अध्यक्षीय भाषणातून प्रा. श्रीकृष्ण बनसोड म्हणाले की, ओबीसी प्रवर्गातून माळी समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे.आजच्या मनुवादी व्यवस्थेमुळे फुले-शाहू- आंबेडकरांचे अनुयायी तसेच अल्पसंख्यांक यांनी संघटित होण्याची गरज आहे. असे विचार व्यक्त केले.
श्री प्रकाश पाचघरे, माजी सरपंच अजय नागोने, बाबाराव लंगडे, माजी सरपंच संगीता पाचघरे, उपसरपंच अब्दुल अन्सार,शरद पाचगरे, प्रवीण नाकाडे,यादव लोमटे, वसंतराव पाचघरे,प्रतीक साबळे, मुमताज हुसेन यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन प्रकाश पाचघरे तर अभार शशिकांत खोब्रागडे यांनी मानले.