Home Breaking News भरधाव ट्रकखाली येऊन पाच वर्षीय बालिकेचा मृत्यु

भरधाव ट्रकखाली येऊन पाच वर्षीय बालिकेचा मृत्यु

109

🔺संतप्त जमावाच्या गर्दीने महामार्गावर काही काळ चक्का जाम

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 25 ऑगस्ट):- तालुक्यातील सुकळी जहागीर येथे – भरधाव येणाऱ्या ट्रकखाली येऊन पाच वर्षीय बालीकेचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना दि 24 रोजी दुपारी 3 वाजताचे दरम्यान नागपुर -तुळजापुर महामार्गावर शहरापासुन पाच की मी अंतर असलेल्या सुकळी (ज) येथे घडली.

ट्रक चालकाने भरधाव ट्रकने बालीकेला चिरडल्यानंतर समोरून येणाऱ्या आदीलाबाद – माहूर गाडीला घासत उमरखेड कडे निघुन गेला त्यास काही युवकांनी पाठलाग करीत शहरात पकडून मारहान केली.

यावेळी चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले. या घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतल्याने संतप्त जमावाकडून होणारा पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.

तश्कीन फातेमा शेख माजीद वय 5 वर्षे असे भरधाव ट्रक खाली चिरडून मृत झालेल्या बालिकेचे नाव असून तिच्या घरासमोरून बोरी – तुळजापूर महामार्ग गेला असून समोर उड्डाणपुलाचे काम प्रलंबित आहे महागाव कडून उमरखेड कडे येणाऱ्या भरधाव ट्रक क्र एम एच 40 सीडी 9552 चा चालक सुनील कुमार भोले पटेल वय 34 रा मध्यप्रदेश याने भरधाव ट्रक चालवत घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षे बालिकेला चिरडले त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला बालीकेला चिरडल्यानंतर समोरून येत असलेल्या आदीलाबाद माहूर या आंध्र प्रदेशच्या बस क्र टी.एस 01 यु.सी 6633 बसला घासत उमरखेड कडे पलायन केले.

सुदैवाने बसला धडक बसली नसल्याने प्रवासी सुखरूप बचावले सदर ट्रक चालकाने ट्रक भरधाव पणे उमरखेड कडे नेला सदर ट्रकचा पाठलाग सुकळी येथील काही युवकांनी करून त्या ट्रकला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पकडले व ट्रक चालकास मारहाण केली.

त्यावेळी तिथे आलेले पोलीस जमादार संदीप ठाकूर व गिरुप्पा मुसळे यांनी ट्रक चालकास पोलीस स्टेशन कडे रवाना केले.

तोपर्यन्त संतप्त युवकांनी ट्रक ताब्यात घेऊन घटनास्थळाकडे नेऊन जाळण्याच्या बेत पोलिसांनी पाठलाग करत सुकळी जवळ तो ट्रक ताब्यात घेतला त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांचे समवेत उमरखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे सह वाहतूक कर्मचारी व आर सी पी चे जवान घटनास्थळी दाखल झाले.

संतप्त जमावाने घटनास्थळावर गर्दी केली होती या रस्त्यावरून भरधाव वाहने चालतात त्यामुळे या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बनवून द्या असा आग्रह जमावाने धरला होता त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून तात्काळ स्पीडब्रेकर करण्यात येतील असे सांगितल्यानंतर जमावाने रस्ता मोकळा केला यामध्ये ट्रक चालक सुनील कुमार भोले पटेल याचे विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here