✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.25ऑगस्ट):-दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी पालम शहरात सराफा दुकानावर बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सराईत गुन्हेगार असणारे दोघांना स्थानिक गुन्हे शाखा परभणी पोलिसांनी दिनांक 23 ऑगस्ट रोजी पुणे या ठिकाणी जाऊन अटक केली आहे.दिनांक 4 फेब्रुवारी रोजी साडेआठच्या सुमारास पालम शहरातील सराफा व्यापाऱ्यास धारधार शस्त्र व बंदुकीचा धाक दाखवून सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असे एकूण 16 लाख रुपयाचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले होते.
या दरोड्यामुळे पालम शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या गुन्ह्यात एकूण सहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यातील तीन आरोपी या अगोदरच स्थानिक गुन्हे शाखा परभणी या पथकांनी अटक केली आहे.
दिनांक 23 ऑगस्ट रोज गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस अधीक्षका रागवसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्यावतीने पथक स्थापन करून आरोपीचा शोध सुरू केला गुप्त माहितीच्या आधारावर आदर्श कॉलनी रेल्वे गेट मांजरी हडपसर पुणे येथे सराईत गुन्हेगार नागेश पोचिराम गायकवाड व शिवराज जयराम खंदारे दोन्ही राहणार शिवराम नगर नांदेड हे दोघेही एका किरायाच्या खोलीमध्ये राहत होते त्यांना त्या ठिकाणी सापळा रचून अटक करण्यात आले त्यांच्या कडून चार मोबाईल रोख रक्कम दोन हजार पाचशे रुपये जप्त केले असून त्यांना पालम पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या अगोदर याच गुन्ह्यातील आरोपी सतीश घोरपडे, वसंत नामदेव देशमुख, निवृत्ती सोनकांबळे अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून मोका अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. यां आरोपीचा शोध मागील सात महिन्यापासून सुरूच होता मोठ्या शिताफीने व सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती, पोलीस हवालदार विलास सातपुते,परसराम गायकवाड, मधुकर ढवळे,राम पौळ,चालक केंद्रे यांनी या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे.