Home चंद्रपूर महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौदळ यांची मोहर्ली गावास भेट

महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौदळ यांची मोहर्ली गावास भेट

111

🔸कचरा वर्गीकरण करणा-या महीलांशी साधला संवाद

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपुर(दि.25ऑगस्ट):- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौदळ हे विदर्भाच्या दौ-यावर असतांना चंद्रपुर जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. त्यावेळी मोहर्ली गावाला नुकतीच भेट दिली असुन, मोहर्ली येथे चालत असलेल्या कचरा वर्गीकरन युनिटची पाहणी केली आहे. मोहर्लीसारखे सर्व गावात कचरा वर्गीकरन युनिट तयार करा असे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौदळ यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात काम सुरु असुन,जिल्ह्यात पहिल्यादांच चंद्रपुर तालुक्यातील मोहर्ली यागावात कचरा वर्गीकरण युनिट तयार करण्यात आले असुन, या ठिकाणी गावातील पुर्ण सर्व प्रकारचा कचरा गोळा करुन , घंटागाडी च्या मदतीने आणल्या जातो. याठीकाणी पाच महीला काम करित आहे या महिलांच्या मदतीने गोळा होणा-या सुका कच-याच नियमित वर्गीकरण करण्याच काम चालु आहे. या युनिटमुळे येथिल पाच महिलांना सुध्दा रोजगार प्राप्त झाला असुन, गावात कच-याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन केल्या जात आहे. गोळा होणा-या प्लॉस्टीक कच-याचा पुनरवापर करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौदळ चंद्रपुरच्या दौ-यावर असतांना, मोहर्ली येथे सुरु असलेले कचरा वर्गीकरण युनिट ला भेट देवुन, या ठिकाणी काम करीत असलेल्या महिलांशी संवाद साधुन , माहीती जाणुन घेतली. महीलांनी माहीती देतांना कचरा वर्गीकरण युनिट मध्ये किती प्रकारचा कचरा गोळा होतो, अंदाजे रोज गोळा होणारा कचरा, कचरा गोळा करण्याची पध्दत , कुजणारा कचरा, घंटागाडीचा वापर कसा होतो. गावात रोज कचरा गोळा करतांना किती वेळ लागतो, यासाठी गावात केलेली जनजागृती , येणा-या अडचणी , यासर्वाच नियोजन करुन काम कस चालत याबाबत महीलांनी अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौदळ यांच्याशी संवाद साधुन माहीती सांगितली. रौदळ यांनी काम करीत असलेल्या महिलांचे कौतुक केले आहे.

यावेळी सॅनेटरी पॅड डिसट्र्याय मिशन ची पाहणी करुन, मोहर्लीत उभारण्यात येत असलेल्या प्लॉस्टीक युनिटच्या कामाची पाहणी करुन चालु असलेल्या कामाविषयी माहीती जाणुन घेतली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता, नुतन सावंत , राज्य पाणी व स्वच्छता मिशन मुंबई कार्यालयाचे माहीती शिक्षण संवाद तज्ञ आशीष थोरात, सनियत्रंन मुल्याकंन तज्ञ सुजाता सामंत, चंद्रपुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, मोहर्ली ग्रामपंचायतच्या सरपंच सुनिता कातकर, ग्रामविकास अधिकारी युवराज विसकळे, माहीती शिक्षण संवाद तज्ञ कृष्णकांत खानझोडे, सनियत्रंन मुल्याकंन तज्ञ साजिद निजामी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजंय धोटे, योगेश जोशी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here