✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.25ऑगस्ट):- दि.24 ऑगस्ट लॉयन्स क्लब गंगाखेड टाउन व लॉयन्स नेत्र रुग्णालय सिडको नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गीता मंडळ या ठिकाणी दिनांक 24ऑगस्ट गुरुवार रोजी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले . या शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यासपीठावर झोन चेअर पर्सन अतुल गंजेवार,लॉयन्स क्लबचे अध्यक्ष लॉ.श्रीधराचार्य जोशी लॉ कोशाध्यक्ष मकरंद चिनके सचिव लॉ. भगत सुरवसे संचालक लॉ नागेश केरकर,कॅबिनेट ऑफिसर लॉ.गोविंद रोडे उपाध्यक्ष लॉ.बालासाहे यादव, महेश अप्पा सामगे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरामध्ये जवळपास 110 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली व यापैकी 30 पात्र रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी निवडण्यात आले . या रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन नांदेड येथील लायन्स नेत्र रुग्णालयात करण्यात येणार असून त्यांचे ऑपरेशन, राहण्याची सोय, जेवणाची व्यवस्था, डोळ्याच्या लेन्स, काळा चष्मा या सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत .तसेच ऑपरेशन साठी जाण्याची व्यवस्था लॉयन्स च्या गाडीतून करण्यात आली आहे.
रुग्णांच्या नेत्र तपासणी साठी नांदेडच्या राजकुमार पवार तंत्र सहाय्यक यांनी मोलाची मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी लॉ.उपाध्यक्ष अभिनय नळदकर,संचालक लॉ.बंडू घुले,प्रकाश घन सर, उमाकांत कोल्हे,कॅबिनेट ऑफिसर जगदीश तोतला,लॉ.विष्णू मुरकुटे,राजू देशमुख, राम कासंडे,बालासाहेब मुंडे,संदीप राठोड,उमेश पापडू,महेंद्र कांबळे,विठ्ठल शिंदे,महेंद्र वरवडे,शेख महेमुद,विरल मेहत्रे, मोहन सानप,आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगत सूरवसे यांनी तर आभार गोविंद रोडे यांनी मानले.