(त्वरित शिक्षक द्यावा म्हणून भीम टायगर सेनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन)
✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड (दि. 24 ऑगस्ट) येथील शहिद भगतसिंग उच्च प्राथमिक व माध्यमिक नगर पलिका शाळेमधील विज्ञान विषयासाठी शिक्षक त्वरीत पाठवावा.
कारण शाळा सुरु झाल्यापासून वर्ग 9 वा वर्ग 10 वा करीता आता पर्यंत विज्ञान विषय शिकविण्याकरीता शिक्षक रुजू झालेला नाही.त्यामुळे विद्यार्थी मुला मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे.आज पर्यंत येथे विज्ञान विषय शिवण्यासाठी शिक्षकच नाही.
विज्ञान विषयासाठी शिक्षक शाळेमधील विद्यार्थ्याच्या पालकांनी भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून हि बाब लक्षात आणून दिली आहे.
म्हणून आम्ही लगेच मुख्याधिकारी यांनी शहिद भगतसिंग शाळेमध्ये विज्ञान विषयाचा शिक्षकास त्वरित पाठविण्यात यावे.
अशा मागणीचे शाम धुळे (जिल्हा कार्यध्यक्ष यवतमाळ), सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष उमरखेड) यांनी निवेदन दिले आहे.