Home महाराष्ट्र कृषिकन्यांनी केले गाजरगवत जागरूकता सप्ताहा चे आयोजन

कृषिकन्यांनी केले गाजरगवत जागरूकता सप्ताहा चे आयोजन

78

✒️रोहन कळसकर(विशेष प्रतिनिधी)

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याशी संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअन्तर्गत कृषिकन्यांनी गाजरगवत जागरूकता सप्ताह साजरा केला.गाजरगवत जागरूकता सप्ताह हे आई.सी.ए.आर्-DPR हैद्राबाद द्वारे १६-२२ ऑगस्ट या दरम्यान आयोजित केल्या गेला होता.जामगांव (बु.) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इथे साजरा करण्यात आला .या उपक्रमात कृषीकन्यानंबरोबर विद्यार्थ्यांचा उत्साहाचा समावेश दिसून आला .

कृषीकन्यांनी गाजरगावाताविषयीची माहिती अ त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला .त्याचप्रमाने एकच नारा गाजरगवत मारा, धरुया आपण एकच प्रण करूया गाजरगवताचे नियंत्रण ,गाजरगवत काढा आयुष्य पाळा अश्यप्रकार चे नारे करून गावाकऱ्यांना जागरूक केले.

कृषीकन्यांनी जिल्हा पारिषद उच्च प्राथमिक शाळा जामगाव(बु.) येथील विद्यार्थी व शिक्षक एवं कर्मचाऱ्यांबरोबर गावात फेरीचे आयोजन करून लोकांना जागरूक करण्याचे काम केले व त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील गाजरगवत काढण्याचा उपक्रम देखील राबवला व विद्यार्थांना या उपक्रमासाठी सेंन्हिटाईझर , हॅन्डग्लव्स्,व मास्क यांचे वाटप केले,याचबरोबर गाजरगवत कसे नियंत्रित करावे याकरिता शक्य असण्याऱ्या सोप्या पद्धतींची माहिती गावाकऱ्यांना सांगितली ,अश्याप्रकारे कृषिकन्यांनी गाजरगवत जागरूकता सप्ताह साजरा केला.

सदर उपक्रम आनंद निकेतन कृषी महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. एस.एस.पोतदार,कार्यक्रमप्रभारी डॉ. आर.व्ही.महाजन,कार्यक्रम समन्व्यक व डॉ. व्ही.व्ही.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.या कार्यक्रमात झील सोमकुंवर,वैष्णवी राऊत,मानसी ताकवले,प्राजक्ता रायपूरे ,अश्विनी सोनवाने,धनश्री शेरकी या कृषिकन्यांचा समावेश होता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here