✒️सिध्दार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी)मो:-9823995466
उमरखेड (दि. 21 ऑगस्ट):-उमरखेड तालुका लोकमतचे प्रतिनिधी निर्भीड पत्रकार सामाजिक कार्यात रुग्णसेवेसाठी सातत्याने काम करणारे पत्रकार डॉ. अविनाश खंदारे यांना पिंपरी चिंचवड एडिटर गिल्ड यांच्यावतीने यावर्षीचा निर्भीड पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गेल्या 25 वर्षा पासुन ग्रामीण भागात निर्भिड पत्रकारीता करणारे तालुका प्रतिनिधी असलेले डॉ अविनाश खंदारे यांना पिंपरी चिंचवड एडिटर गिल्ड यांच्यावतीने यावर्षीचा निर्भीड पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार 19 ऑगस्टला मनसेचे प्रमुख राजठाकरे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पिंपरी-चिंचवड एडिटर्स गिल्डच्या वतीने पत्रकार हल्लाविरोधी कायदा परिषद आणि पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव झाला त्यावेळी हा राज्यस्तरीय पुरस्कार संपूर्ण राज्यातून ग्रामीण भागातील गेल्या 25 वर्षा पासून निर्भिड पत्रकारिता करणारे डॉ अविनाश खंदारे यांची निवड करण्यात आली होती आणि त्याना पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अविनाश चिलेकर होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणुन ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, टाईम्स नाऊ मराठीचे संपादक मंदार फणसे, लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार पुढारीचे संपादक सुनील माळी, सीविक मिररचे संपादक अविनाश थोरात , गोविंद वाकडे, अमित मोडक, संदीप महाजन, अश्विनी सातव डोके, नितीन पाटील, आशिष देशमुख, महेश तिवारी प्रमुख उपस्थिती होती.या पत्रकार हल्ला विरोधी परिषदेला राज्यातून मोठया प्रमाणात पत्रकार उपस्थित होते.