✒️सातारा-खटाव, प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812
सातारा(दि.21ऑगस्ट):-जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे हे एक कर्तव्य दक्ष अधिकारी असून पुसेगाव पोलिस स्टेशन चे नाव महाराष्ट्रभर च नव्हे तर देशभर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. नुकताच पुसेगाव पोलिस स्टेशन चा महाराष्ट्रात पहिला नंबर आला आहे.
यासाठी कर्तव्यदक्ष राहुन सातत्याने प्रयत्न करणाऱ्या अधिकारी व स्टाफ ची स्थानिक राजकीय गटबाजीतुन बदनामी होऊ नये याची दोन्ही ही राजकीय गटानी नी काळजी घेणे गरजेचे आहे. पुसेगाव पोलिस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी यांच्या चांगल्या कामाबाबत राज्याचे गृहमंत्री यांच्याशी फोन वर चर्चा करून शिफारस केल्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष धीरज जाधव यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पुसेगांव हे नेहमीच राजकिय दृष्टीने शांतता प्रिय गाव म्हणून ओळखले जाते. पुसेगाव पोलिस स्टेशन च्या कार्यक्षेत्रात गुन्हेगारी चे प्रमाणही अत्यल्प आहे. पुसेगाव पोलिस स्टेशन चा आवार ही सुंदर व सुसज्ज असा आहे या सर्व बाबिंचा विचार होऊन पुसेगाव पोलिस स्टेशन चा महाराष्ट्रात पहिला नंबर आला आहे. अशा पोलिस स्टेशन ची व अधिकाऱ्याची बदनामी होऊ नये याची काळजी पुसेगांव मधील दोन्हीही राजकीय गटानी घ्यावी अस आवाहन सातारा जिल्हा युवा मोर्चा चे उपाध्यक्ष धीरज जाधव यांनी प्रसिद्धिस पत्रकाद्वारे केले आहे.