✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.21ऑगस्ट):- येथे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृती दिन व राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिनानिमित्त गंगाखेड येथील फुलेनगर मध्ये सांस्कृतिक सभागृहात अंधश्रद्धा निर्मूलन समिती गंगाखेड व भारतीय बौद्ध महासभा महिला मंडळाच्या वतीने वैज्ञानिक दृष्टीकोनावर सप्रयोग व्याख्यान यांच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत बार्टीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रकाश सिंगाडे,रोहिदास लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघर्ष प्रतिष्ठान अध्यक्ष प्रवीण घोबाळे यांची उपस्थिती होती.
वैज्ञानिक दृष्टीकोनावर बोलतांना मुंजाजी कांबळे म्हणाले,जीवन जगण्याचा,यशस्वी होण्याचा, अधिक चांगला माणूस होण्याचासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे. त्यामधूनच स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो.वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे हे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये सांगितले आहे.समाज विज्ञानिष्ठ व्हावा,विवेकी व्हावा यासाठीच डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्य वेचले. शेवटी,कांबळे म्हणाले प्रगत समाज घडायचा असेल तर अंधश्रद्धेला मुठमाती दिली पाहिजे हा बाबासाहेबांचा विचार प्रत्येकांनी अंगिकारला पाहिजे………………….
याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रकाश सिंगाडे यांनी चमत्काराचे सादरीकरण करून ते कसे घडतात? त्या मागचे विज्ञान समजावून सांगितले.प्रत्येकांनी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासून प्रत्येक घटनेच्या मागचा कार्यकारणांचा शोध घेऊन आपल्यातली भीती,भय काढून टाकून निर्भय बनावे असे सांगितले… अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त बार्टी प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रकाश शिंगाडे,पत्रकार राहुल साबणे,नगरसेविका विमलताई घोबाळे, यांची उपस्थिती होती. यावेळी रोहिदास लांडगे यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश जोंधळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ साळवे यांनी केले. महात्मा फुले नगरातील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा दहावा स्मृतिदिन कार्यक्रम यशस्वी करण्यासा ठी सखाराम पंडित,शोभाबाई मस्के,सुनंदाबाई सूर्यवंशी,जलसाबाई पंडित,पदमीनबाई मस्के इत्यादींनी परिश्रम घेतले.