Home महाराष्ट्र त्या` निराधार वृद्धेस भाजपने दिला आधार !

त्या` निराधार वृद्धेस भाजपने दिला आधार !

71

🔸समाज माध्यमावरील व्हायरल पोस्टनंतर मदत (नितीन भुतडा चा पुढाकार)

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि. 20 ऑगस्त):- एक निराधार वृद्धा संततधार पावसात आपल्या नातीसह कसाबसा पावसापासुन बचाव करीत दिवस कंठत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला.

हा व्हायरल व्हिडीओ पाहताच भाजपाचे यवतमाळ, पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी महीलेची दखल घेतली. तात्काळ एका पत्राखाली प्रपंच सांभाळणाऱ्या महीलेस आवश्यक तेव्हढे टिनपत्रे पाठवित भुतडा यांनी संवेदना जोपासली.काल पासुन संततधार पाऊस सुरु आहे. यापुर्वीही मागील महीण्यात पावसाने जिल्हाभरात दाणादान उडवून दिली होती.

अशात एक वृद्ध महीला आपल्या 14 वर्षांच्या नातीसह एक टिनपत्र असलेल्या छतावर दिवस कंठत आहे. अन्नपुर्णा बनसोड (70) रा. विडुळ असे या निराधार महीलेचे नाव आहे. अन्नपुर्णा यांचा मुलगा अंकुश बनसोड याने साधारणत: दोन वर्षांपुर्वी आत्महत्या केली. मृतक अंकुशने आत्महत्या करीत जगाचा निरोप घेतला. मात्र वृद्ध आईच्या जिवावर आपल्या 14 वर्षाच्या मुलीची जबाबदारी टाकून गेला.

वृद्ध अन्नपुर्णा आपल्या नातीला घेवून कसाबसा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घरावर एकच टिनपत्र आहे. अशा पावसात एका टिनाखाली नातीला घेवून त्या कशातरी दिवस ढकलीत आहेत.

अशात त्यांची ही अवस्था सुदर्शने भवरे नामक तरुणाने पाहीली. वृद्ध अन्नपुर्णा आणि त्यांच्या नातीला किमान चार पत्रांची मदत तरी झाली पाहीजे, या हेतुने सुदर्शन भवरे यांनी अन्नपुर्णा यांचा पावसात कसाबसा दिवस कंठण्याचा व्हिडीओ शेअर केला. यात भवरे यांनी अन्नपुर्णा यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले.

हा व्हिडीओ भाजपाचे यवतमाळ आणि पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी पाहीला. त्यांनी तात्काळ अन्नपुर्णा आणि त्यांची नात रजनी बनसोड यांची दखल घेत बारा टिनपत्रांची व्यवस्था करुन देत सामाजीक बांधीलकी जोपासली.या घटनेनंतर समाज माध्यमाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here