✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.19 ऑगस्ट)-विद्यार्थिनींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिक्षक व पालक यांच्यामध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने स्थानिक ने. हि. कन्या विद्यालय, ब्रम्हपुरी येथे शिक्षक – पालक सभा संपन्न झाली.
सदर सभेमध्ये विद्यार्थिनींची प्रगती, इतर शालेय उपक्रम आणि समस्या यावर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मा. मुख्या. सौ. बनपुरकर मॅडम तर विशेष अतिथी मा. श्री. अशोकजी भैया साहेब, सचिव, ने. हि. शिक्षण संस्था ब्रम्हपुरी, पालक प्रतिनिधी श्री. भुजराजजी सहारे, स्त्री पालक प्रतिनिधी लिनाताई ठाकरे, उपमुख्या. श्री. भैया सर, पर्यवेक्षक श्री. निखारे सर उपस्थित होते.सभेला संबोधित करताना विशेष अतिथी मा. श्री. अशोकजी भैया साहेब यांनी पालकांच्या समस्यांचे निराकरण केले.
बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा, स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी संस्थेने सुरू केलेल्या प्रत्येक वर्गखोल्यातील प्रोजेक्टर सुविधेचा निश्चितच फायदा होईल असे प्रतिपादन केले. प्रास्ताविकात उपमुख्या. श्री. भैया सर यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची, शैक्षणिक सुविधांची माहिती पालक वर्गाला करून दिली. तसेच पालक प्रतिनिधी श्री. सहारे यांनी शाळेने सुरू केलेल्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्यात.
अध्यक्षीय भाषणात मा. मुख्या. सौ. बनपुरकर मॅडम यांनी शाळा नवनवीन आव्हानांचा स्वीकार करून मार्गक्रमण करीत असून, पालकांनी उपस्थित केलेल्या काही समस्यांचे निश्चितच निवारण केले जाईल असे आश्वासन दिले. सदर सभेमध्ये बहुसंख्य पालकांची उपस्थिती उल्लेखनीय होती.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने अशाप्रकारच्या शिक्षक – पालक सभा आयोजित करण्यात आल्यामुळे पालक व शिक्षक यांच्यात योग्य समन्वय साधला जातो असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या संचालिका सौ. गोडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. दलाल मॅडम यांनी केले.