Home महाराष्ट्र विडुळ येथील अन्नपूर्णा बनसोडे या माते च्या मदतीला धावले साहेबराव कांबळे

विडुळ येथील अन्नपूर्णा बनसोडे या माते च्या मदतीला धावले साहेबराव कांबळे

148

🔸आर्थिक सहकार्य देऊन किराणा ही भरून दिला

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 19 ऑगस्ट):-उमरखेड तालुक्यातील विडुळ गावातील एक महिला आपल्या नाती सोबत एका पत्राचे घरा मध्ये आपले जीवन जगत होती.ही बौद्ध समाजातील अन्नपूर्णा बनसोडे ही आई आपल्या नाती सोबत मागील अनेक दिवसापासून विडुळ या ठिकाणी रहात आहे. दीड वर्षांपूर्वी एकच मुलगा होता त्यांनीही आत्महत्या केली.

अशा परिस्थितीमध्ये आपला उदर निवारा करत जगत असलेली ही आई आणि आज अति पाऊस थंडगारठा हवा व एक पडकं घर आणि त्या घरावर एकच पत्र बाकी सर्व साईटवर बांधलेल्या फाऱ्या होत्या.
विडुळ येथील एक सुशिक्षित तरुण सुदर्शन भवरे यांनी यावरील एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हाट्सअप ला व्हायरल केला.व हा वायरल व्हिडिओ ची बातमी सध्या उमरखेड, महागाव तालुक्यात चर्चेत असलेले नाव म्हणजे साहेबराव कांबळे सामाजिक कार्यकर्ते बेलखेडकर यांच्याशी संपर्क साधल्याने कांबळे यांनी तात्काळ आपले कार्यकर्ते विडूळ या गावी पाठवून त्यांनी अन्नपूर्णा आई बनसोडे यांना पाच हजार रुपये रोख रक्कम नगदी नेऊन आणि जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या जेवणाचे साहित्य किराणा पण त्यांच्या सोबत पाठवला.

पुन्हा एकदा साहेबराव कांबळे यांनी अशा प्रकारे आपल्या समाजकार्याचा पुरावा दिला आहे.उमरखेड महागाव विधानसभेमध्ये या अगोदर असा कोणताही आमदारकीच्या उमेदवाराने गोरगरीब जनतेला मदत केलेली आठवत नाही.या सहकार्यामुळे बनसोडे परिवार आज आनंदाने जगत आहे व साहेबराव कांबळे यांचे खूप खूप आभार व धन्यवाद मानत आहे.

अशा प्रकारची गरीब कुटुंबाला मदत केल्याबद्दल संपूर्ण उमरखेड व महागाव तालुक्यात साहेबराव कांबळे यांची चर्चा दिसत आहे.आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये साहेबराव कांबळे हे सामान्य गोरगरीब जनतेचा नेता म्हणून निवडून येतील अशी चर्चा जोर देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here