✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड (दि.19 ऑगस्ट):-आपसातील गट तट बाजूला सारून समाजाच्या उद्धारासाठी सर्व आंबेडकरी समाज, बहुजन घटकातील बांधवांनी भविष्यात एकत्र यावे असे भावनिक आवाहन सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांनी केले.
स्थानिक बोरबन येथील सुमेध बोधी विहारात सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांचा समाजाच्या वतीने विहार समितीच्या वतिने आयोजित सत्कार समारंभात ठेवण्यात आला होता. त्या प्रसंगी सत्काराला स्वीकारून ते बोलत होते की, जर समाजाला आपला सर्वांगिन विकास साधायचा असेल तर एक होण्या शिवाय पर्याय नाही. त्याच बरोबर विहाराचा विकासासाठी त्यांनी दोन लाख निधी जाहीर केला.
साहेबराव कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातुन उमरखेड विधानसभा क्षेत्रातील निट- जेईई अभ्यासक्रमाला बसलेल्या गरीब विधार्थांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांची क्लासेस फी स्व:तः पुर्णत: भरून एक शेक्षणिक क्रांती केल्या बद्दल साहेबराव कांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन सुमेध बोधी मंडळाने त्यांना बळ देण्यासाठी समाजाच्या वतीने छोटेखानी सत्कार समारंभ आयोजीत केला होता.
यावेळी कार्यक्रमाला कॉंग्रेसचे नेते गोपाल अग्रवाल, प्रा.डॉ.अनिल काळबाडे,पत्रकार सघाचे माजी अध्यक्ष अविनाश खंदारे, भिमराव सोनुले, प्रा.डॉ.धनराज तायडे , केशवराव निथळे, उद्धव गायकवाड, गणेश धुळधुळे, सुभाष पाईकराव,कमलाकर कांबळे, भिमराव अठवले सह मोठ्या प्रमाणावर समाजबांधव हजर होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विहार मंडळाच्या सर्व पदाधिकार्याने मदत केली.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.डॉ.अनिल काळबाडे यांनी मांडली तर सुत्रसंचालन प्रा.राजाभाऊ धाडे यानी केले व आभार समितेचे कार्याध्यक्ष संतोष निथळे यांनी केले.