Home महाराष्ट्र खामगाव न.प.ला दिव्यांगांच्या विविध समस्यांचे विराट मल्टीपर्पज फाऊंन्डेशनच्यावतिने निवेदन

खामगाव न.प.ला दिव्यांगांच्या विविध समस्यांचे विराट मल्टीपर्पज फाऊंन्डेशनच्यावतिने निवेदन

109

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगाव(दि.19ऑगस्ट):-दि.१७/०८/२०२३ ला खामगाव नगर परिषद ला मुख्याधिकारी ऊपमुख्याधिकारी यांच्या गैर हजेरीत व्रुक्ष अधिकारी हतोने मॅडम यांना प्रेस कल्ब अध्यक्ष किशोर भोसले,यांच्या प्रमुख ऊपस्थितीत विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन अध्यक्ष मनोज नगरनाईक,क्षञुधन ईंगळे यांचे मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये खामगाव शहरातिल बेरोजगार ,फिरस्ती व्यवसाय करुन आपली ऊपजिवीका करतात त्यांना शासनाच्या धोरणा नुसार व्यवसाईक जागा ऊपलब्द करत त्यांना ती तत्काळ ऊपलब्द करुन देण्यात यावी

दिव्यांग सानुग्रह अनूदान ५% निधी अनुक्रमे १२००/-,१६००/-,
२०००/- असे वितरित करण्यात येते त्यात मागिल आर्थिक वर्षातिल ऊर्वरित रक्कम चा समावेश करत त्यात वाढ करण्यात यावी
आपल्या नगरपालिकामध्ये काही बोगस वा आॅफलाईन असलेल्या आॅनलाईन नसलेल्या दिव्यांगांच्या नोंदी आहेत त्या रद्द करत केंद्र सरकारच्या दिव्यांग सुरक्षा कायदा २०१६नुसार युडिआयडी प्रणालीद्वारे निर्गमित झालेल्यांनाच या अनुदानाचा लाभ देण्यात यावा

आपल्या नगरपालिकामध्ये दिव्यांग प्रतिनीधींचा समावेश करत दिव्यांग समिती स्थापन करण्यात यावी

ऊच्चशिक्षण घेत असलेल्या दिव्यांगांना आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य ऊपलब्द करुन देण्यात यावे

आपल्या न प ने मागिल काळात Alimcocsc.in ची आॅनलाईन नोंदणी केली होती त्यांना अजुनही कुठल्याच प्रकारचे आवश्यक असलेले साहित्य वाटपचे नियोजन केले नाही त्याचेही तत्काळ नियोजन करत ते साहित्य वाटपाचे शिबीर आयोजित करण्यात यावे

ग्रामपंचायतीसाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडुन विविध योजना करिता पंचायत समिती मार्फेत नियोजन होत असते परंतु आपल्या नगर परिषद ला याच धर्तिवर नियोजन करणे गरजेचे आहे याचीही अंमलबजावणी आपल्याकडुन करण्यात यावी यावेळी मधुकर पाटिल, मोहम्मद राजिक कुरेशी,हरिष जोशी,अमोल तंबोले,ऊमेश देशमुख,हर्षल खराबे,मनोज गनवाणी,सतिष पैंदाम,चंद्रभान चोपडे,कौशिक भेरडे,गजानन कुळकर्णी,पायल शर्मा,श्रीकांत कल्याणकर,प्रकाश नाटेकर,अनंता फुंडकर,सुलोचना माकोडे,कविता ईंगळे,वसंत चिखलकर विनोद पवार आदी यावेळी हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here