Home महाराष्ट्र आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

106

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.19ऑगस्ट):- जे माणसं इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही.आपला इतिहास लढवय्या आणि संघर्षमय आहे. तोच संघर्षाचा आणि लढवय्या इतिहास नजरे पुढे ठेऊन भारतीय मूलनिवासी असलेल्या आदिवासी मुला मुलींनी स्पर्धा परीक्षेत उतरावे यूपीएससी एमपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी वाचनाची आवड निर्माण करून पुस्तकाला खरा मित्र बनवून कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी, अभ्यासात सातत्य,वेळेचे नियोजन, करून आपल्यातील न्यूनगंड बाजूला सारून परिस्थितीचे रडगाणे न सांगता त्यावर मात करून जिद्दीने पेटून उठा आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागा नक्कीच तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुमचे स्वप्न पूर्ण होणार असे प्रतिपादन प्रशांत डांगे यांनी आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.

भारतीय संविधान आपल्याला अधिकार हक्क कर्तव्य आणि समान संधी देते. त्यामुळे भारतीय संविधानचे वाचन करणे तसेच छ्त्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,छ्त्रपती शाहू महाराज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आई जिजावू यांचे आदर्श विचार अंगीकृत करून स्वतः बरोबर समाजाला चांगली दिशा देण्याची जबाबदारी आजच्या विद्यार्थ्यांवर आहे असे प्रतिपादन नरेश रामटेके यांनी याप्रसंगी केले.

नरेंद्र दाभोळकर स्मृतिदिन-विशेष लेख

आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात वसतिगृहातील मुली आणि मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह अधीक्षक मारबते मॅडम तर मुलांचे वस्तीगृह अधीक्षक खंडाते सर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थीनी कांचन उसेंडी तर आभारप्रदर्शन माधुरी पेंदाम या विद्यार्थीनीने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मुलांनी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here