✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.18ऑगस्ट):- तालुका रास्त भाव धान्य दुकानदार व हॉकर्स किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटना या संघटनेकडून रास्त भाव दुकानदार यांचे विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांना उपोषणाचा इशारा. या संघटनेचे तालुकाध्यक्ष शुद्धोदन सावंत यांनी दिला आहे.
गंगाखेड तालुक्यातील रास्त भाव दुकानदार यांना 1 क्विंटल पासून 7 क्विंटल पर्यंत धान्य कमी आल्यामुळे ह्या महिन्यात धान्य वाटप करण्यास अडचण येणार असून, प्रत्येक दुकानदारांचे 10% कार्डधारक धान्यापासून वंचित राहणार असल्याची भीती आहे या, कार्डधारक धान्य का दिले नाही म्हणून दुकांदारांसोबत वाद घालून तक्रार करण्याची शक्यता आहे. म्हणून खालील प्रकारे मागण्या संदर्भात उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे
1) दुकानदार यांना ऑनलाइन की-रजिस्टर प्रमाणे 100% धान्य देण्यात यावे.
2) तसेच रास्त भाव दुकानदारांचे एप्रिल, मे व जून या तीन महिन्याचे मार्जिन ची रक्कम तात्काळ व विनाअट दुकानदारांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. दुकानदारांच्या हक्काचे पैसे तहसील कार्यालयाने देण्यास टाळाटाळ केल्याने आर्वी जिल्हा वर्धा येथील एका दुकानदाराने आत्महत्या केली होती. गंगाखेड तालुक्यात सुद्धा दुकानदार यांनी आत्महत्या करण्याची वाट तहसील कार्यालय पाहत आहे का ?
3) पुरवठ्यातील कर्मचारी म्हणतात आम्ही नवीन आहोत आम्हाला काम येत नाही असे म्हणून टाळाटाळ करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या ऐवजी दुसरे कर्मचारी देण्यात यावे.
4) दवाखान्यासाठी, शाळेत ऍडमिशन साठी, घरकुल मिळण्यासाठी शिधापत्रिकेची आवश्यकता असते त्या शिधापत्रिकेसाठी लागणाऱ्या ऑनलाइन शपथपत्राची अट रद्द करण्यात यावी.
अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवणारे पर जिल्ह्यातील दोघेजण चकलांबा पोलिसांकडून जेरबंद
वरील मागण्या मान्य न झाल्यास सर्व रास्त भाव दुकानदार यांनी दि.22-08-2023 वार मंगळवार रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष शुद्धोदन सावंत, जिल्हाध्यक्ष दिलीपराव फड, तालुकाउपाध्यक्ष गोविंद काळे, सल्लागार रामराव राठोड व तालुक्यातील रास्त भाव दुकानदार यांच्या सह्या आहेत.