🔸पार्डी ग्रामपंचायतीचा उपक्रम
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.18ऑगस्ट):- तालुक्यातील पार्ङी ग्रामपंचायतीच्या वतीने 18 ऑगस्ट हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त पार्ङी येथील २० प्रगतिशील शेतकऱ्याचा शाल प्रमाण पत्र व पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी.सरपंच सौ.संगीता राठोड ह्या होत्या.प्रमुख अतिथी म्हणून कृषी प्रवेक्षक सुर्वे साहेब करण ढेकळे ज्ञानेश्वर वाठ सचिव विजय इसलकर हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मोरेश्वर राठोड,बाबुराव पवार, पुतलीबाई राठोड, सुंदरसिंग राठोड,नेमीचंद पवार, विठ्ठल जाधव,वामन जाधव,अरुण नागुलकर,संदीप केवटे,बाबाराव ढेकळे,रमेश भोणे,संजय कानडे,माधव मोरे,किरण ढोले,निलेश देशमुख ,चंद्रकांत कांबळे ,अमोल झरकर,संजय गोरे.माणिक गोरे,राजू जाधव.नितीन गोरे. यांचा शाल प्रमाण पत्र व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी करण ढेकळे यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायतचे सचिव विजय इसलकर,यांनी केले.कार्यक्रमाला ग्रा.प.सदस्य समाधान केवटे,बाबाराव अंभोरे,सुनिल राठोड,रामदास केवटे,राजू मोरे,अशोक गोरे, दिपक मोरे विक्की झरकर,सलीमभाई, संदिप भोणे,माधव भांगे, प्रकाश गोरे,परसराम गोरे,देविदास झरकर, ज्ञानेश्वर राठोड, संभाजी केवटे,विष्णू केवटे,समाधान शिनगारे,ओंकार पवार.हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरुण बरडे यांनी मांनले. कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.