Home महाराष्ट्र गंगाखेड विधानसभेतील शेतकऱ्यांना सरसकट अग्रीम द्यावा मनसेची मागणी

गंगाखेड विधानसभेतील शेतकऱ्यांना सरसकट अग्रीम द्यावा मनसेची मागणी

254

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18ऑगस्ट):- तालुक्यासह पालम पूर्णा व संपूर्ण परभणी जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून पावसाचा सतत खंड पडल्यामुळे सोयाबीन कापूस मूग उडीद तूर 60 ते 70 % आधी पिके वाळून करपून गेली आहेत या पिकांसाठी विधानसभेतील शेतकऱ्यांना सरसकट अग्रीम द्यावा या मागणीचे निवेदन दि.17 (गुरुवार) रोजी उपविभागीय अधिकारी यांना मनसेच्या वतीने देण्यात आले आहे.

संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये मागील 21 दिवसापासून पावसाचा खंड पडला असून त्यामुळे जी पिके उगवली आहे ती देखील पाण्याअभावी करपून जात आहेत शेतकरी बांधवांनी पोटाला गाठ बांधून पेरण्या केल्या होत्या परंतु त्यांच्यावर निसर्गाच्या व कृपेमुळे जवळपास 60 ते 70 टक्के पिके आज वाळून गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे परिणामी शेतकरी चांगला धस्तावला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

त्यामुळे शेतातील पिकांचे नजर अंदाज सर्वेक्षण करून आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनी यास आदेश देऊन 25% अग्रीम विमा सर्व शेतकरी बांधवांना देण्यात यावा येणाऱ्या आठ दीवसाच्या आत शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नाची दखल विमा कंपनी व प्रशासनाने घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर मनसे जिल्हा संघटक,तथा राज्य उपाध्यक्ष मनशे सेना बालाजी मुंडे,शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष हनुमान डबडे,माजी सैनिक तथा शेतकरी रामकिशन मुंडे,परमेश्वर मुंडे, दयानंद सावंत,लखन जोशी, मोहन मुळे, बॉबी बोबडे,बालाजी रणदिवे, गणेश जाधव, श्याम जाधव ,श्रीकांत गोरे, गजानन गोरेवाड ,राहुल पवार,ओम काळे,भागवत बडे, राम सोळंके, माधव भंडे,विजय सोनवणे आदींच्या स्वाक्षरी आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here