🔸पिडीत दिव्यांग लाभार्थी नी केले उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात धरणे आंदोलन
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.14ऑगस्ट):-जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगाना पिठाची गिरणी.मिरची कांडप यांचे वाटप करुन त्यांना सक्षम करण्यासाठी ही योजना राबवली जाते.या साठी खास निधीचीही तरतुद असते.
पण याच निधीवर तत्कालीन समाजकल्याण सभापती रामराव उबाळे व त्यांचा मेहुणा नारायण कांबळे रा.करजी तालुका जिंतूर यांनी संगणनमत करुन परभणी जिल्ह्यातील अंदाजे दिव्यांगाच्या नावे योजना मंजुर करतानाच लाभार्थी कडून सुंदरलाल सावजी या मल्टिस्टेट बॅंकेचे कोरे चेक घेवुन त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करुन घेतले आणि लगेच घेतलेल्या कोरे चेक द्वारें पैसे उचलल्याने लाभार्थी चक्रावून गेले. कोणत्याही सरकारी योजनेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत हे अनुदान जमा करण्याची आवश्यकता असते परंतु यांनी मात्र सुंदरलाल सावजी या मल्टिस्टेट बॅंकेतच हे अनुदान जमा करण्याचे कारण काय असावे ?
कागदोपत्री ही योजना राबवली पण लाभार्थी पर्यंत हा लाभ पोहोचलाच नाही कायदेशीर पणे लाभार्थी हा लाभधारक दाखवुन त्यांचें कोरे चेक सही करुन घेत त्यांच्या खात्यातुन रक्कम उचलुन घेत कायदेशीर पणे भक्कम पुरावे बचावासाठी या मेहुण्याच्या जोडगोळीने बनाव रचत आपण तो मी नव्हेच हे नाटक उत्तम प्रकारे रंगवले आहे.त्यामुळेआज.स्वातंत्र्य दिनाच्या आधी या पिडीत दिव्यांगानी गंगाखेड उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करुन आपली कैफियत मांडली.
या प्रकरणी आता या मेहुण्याच्या जोडगोळीने केलेल्या फसवणूक प्रकरणी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी व मुख्याधिकारी या दिव्यांगाना न्याय देऊन या ठकसेन जोडगोळीने केलेल्या इतरही भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हा दाखल करणारं का असा प्रश्न दिव्यांग लाभार्थी विचारत आहेत