✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.13ऑगस्ट):-चकलांबा पोलिसांची वाळू तस्करा विरोधात दबंग कारवाई केली असून चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 84 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. एपीआय नारायण एकसिंगे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.
पो.स्टे.चकलांबा हद्दीत मौजे राक्षसभुवन येथील गोदावरी नदी पात्रात गणपती मंदिरा समोर दोन हायवा मध्ये चार लोडर ट्रॅक्टरच्या सहाय्याने गोदावरील नदी पात्रातील वाळुचा अवैधरित्या उपसा करुन तिची चोरटी वाहतुक करित आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी आज दिनांक 12/08/2023 रोजी अंदाजे सकाळचे 08.10 वा. बातमीचे ठिकाणी छापा मारला आसता सदर गोदावरी नदी पात्रात चार लोडर (ट्रॅक्टर) हे नदीपात्रातील वाळुचा उपसा करुन दोन हायवा मध्ये भरत असताना मिळुन आले. तेव्हा रेडपार्टीतील चौघांनी दोन हायवा व दोन लोडर (ट्रॅक्टर) चालक यांना जागीच पकडले सदर कारवाई करीत असतांना आणखी नदी पात्रातुन वाळुचा उपसा करीत असलेले दोन लोडर ट्रॅक्टर हे रेड पार्टीस पाहुन पळुन गेले.
व मिळुन आलेल्या 1. हायवा टिप्पर क्रमांक. MH 15 FV 6390 च्या चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेरखाँ बाबु पठाण वय 35 वर्षे व्यवसाय – चालक रा. घोडका राजुरी ता.जि.बीड, 2. हायवा क्रमांक. MH 44 9132 चे चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख साबेर शहाबुद्दीन वय 22 वर्षे व्यवसाय चालक रा.नांदुर हवेली ता. जि. बीड असे सांगीतले, 3) लोडर ट्रॅक्टर क्रमांक. MH 23 BH 1486 च्या चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रदिप अंकुश पोटफोडे वय 30 वर्षे रा.राक्षसभुवन ता.गेवराई 4) लोडर ट्रॅक्टर क्रमांक. MH 21 BV 4845 यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश भालचंद्र कोंढरे वय 35 वर्षे राराक्षसभुवन ता. गेवराई जि.बीड असे सांगितले, पळुन गेलेल्या लोडर ट्रॅक्टर चालकांचे नाव 5) अजय सखाराम कोंढरे 6) बाळासाहेब तात्यासाहेब नाटकर दोन्ही रा. राक्षसभुवन ता. गेवराई असे असुन, पळुन घेवुन गेलेल्या रोडर ट्रॅक्टरचा नंबर दिसला नाही. आरोपी क्रमांक. 1 ते 4 यांचे ताब्यात मिळुन आलेल्या मालाचे वर्णन खालीलप्रमाणे – – 1) 30,00,000=00 एक भारत बेंझ कंपनीचे पिवळ्या रंगाचे हेड असलेला टिप्पर ज्याचा पासिंग नंबर MH 15 FV 6390 असा असलेला.
2) 30,00,000=00 एक भारत बेंझ कंपनीचे पिवळ्या रंगाचे हेड असलेला टिप्पर ज्याचा पासिंग नंबर MH 449132 असा असलेला.
3) 12,00,00=00 लाल रंगाचा रोडर टॅक्टर ज्याचा पासींग क्रमांक MH23BH1486 असा असलेला. 4)12,00,000=00 लाल रंगाचा रोडर टॅक्टर ज्याचा पासींग क्रमांक – MH21BV4845 असा एकुण 84,00,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन वरील आरोपींतांच्या विरुध्द पो.स्टे. चकलांबा येथे गुरनं 228/2023 कलम 379,511,34 भादवि प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि अनंता तांगडे हे करीत असुन पळून गेलेल्या आरोपांचा व वरील गाड्यांच्या मुळ मालकांचा शोध घेवुन त्यांना अटक करीत आहोत.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, मा.उपविभागीय अधीकारी श्री.नीरज राजपुरु साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सपोनि नारायण एकशिंगे व सोबत पोउपनि अनंता तांगडे, पोह/202 तिपाले, पोह/1533 येळे, पोअं/2004 खटाणे, पोअं/2291 पवळ आदींनी केली आहे.