Home महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना समितीत अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल विजयराव सिडाम...

संजय गांधी निराधार योजना समितीत अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल विजयराव सिडाम सरपंच यांनी स्वागत केले

104

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.12ऑगस्ट):-:-कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या कारगाव बु येथील सरपंच श्री विजयराव सिडाम यांनी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांची निवड संजय गांधी निराधार योजना तालुका अध्यक्ष पदी झाल्या बद्दल त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन पेढे भरउन मोठ्या उत्साहात स्वागत केले

तसेच श्री पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले श्री विजयराव कुळमिथे सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमच्या आदिवासी जनतेच्या समस्या जाननारा कार्यकर्ता असुन वेळोवेळी आम्हाला मदत केली असून श्री नारायण हिवरकर यांची संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आदिवासी जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आम्हाला चांगली मदत मिळेल अशा भावना व्यक्त केल्या व पढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here