🔹गुणवंत विद्यार्थी ही राष्ट्राची मौल्यवान संपत्ती – नीलेश ठाकरे
🔸वरूड येथे शेकडो गुणवंत ठरणार सन्मानाचे मानकरी ; मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान !
✒️वरूड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.12ऑगस्ट):- विधानसभा मतदार संघातील वरूड तालुक्यातील शेकडो गुणवंत, कर्तबगार व सिध्दता असणाऱ्यांचा सन्मान, गौरव करणे ही आपली संस्कृती आहे. त्या संस्कृतीला अभिप्रेत असणारा आयोजित सन्मान सोहळा हा कार्यक्रम आहे. तो सामाजिक तेवढाच भावनीक सुध्दा आहे. १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा हा त्यांना भावी उज्ज्वल वाटचालीकरिता ध्येय निर्माण करणारा आहे. अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे.
त्यामुळे युवक युवतींनी उद्याचा बलशाली भारत घडविण्यासाठी विविध क्षेत्रात प्रगतीच्या वाटा प्रशस्त करण्यास स्वतःला झोकुन देत परिश्रमपूर्वक सिध्द व्हावे. गुणवंत विद्यार्थी ही राष्ट्राची मौल्यवान संपत्ती असल्याने त्यांनी घेणारे होण्यापेक्षा देणारे होवून समाजाला, देशाला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करावा यासाठी वरूड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला असून वरूड तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन मथूराबाई ठाकरे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नीलेश ठाकरे यांनी केले.
मथूराबाई ठाकरे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने दि. १३ ऑगस्ट रोजी ११ वाजता वरूड येथील अष्टविनायक सभागृह येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्या प्रसंगी विवीध मान्यवर उपस्थित राहून हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, सत्कारमूर्ती खा. डॉ. अनिल बोंडे जिल्हाध्यक्ष भाजपा अमरावती ग्रामीण, आमदार प्रविण पोटे पाटील शहरअध्यक्ष,भाजपा अमरावती शहर, प्रमुख पाहुणे खा. रामदास तडस, डॉ. रत्नाकर भेलकर पूर्व प्राध्यापक, इंग्रजी विभाग धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर, डॉ. मनोहर आंडे मोर्शी- वरूड विधानसभा निवडणूक प्रमुख, सौ. स्वातीताई युवराज आंडे माजी नगराध्यक्षा नगर परिषद वरूड, रूपेश मांडवे माजी नगराध्यक्ष नगर परिषद शेंदुरजनाघाट, विकास ठाकरे, प्रकाशराव ठाकरे अध्यक्ष विदर्भ समाज कल्याण व बहुउद्देशिय संस्था, येरला, नीलेश ठाकरे संस्थापक अध्यक्ष मथुराबाई ठाकरे चॅरिटेबल ट्रस्ट यांचेसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे .
वरूड येथे सर्व क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जिवनात ज्ञानार्जन करीत प्रगतीच्या भावी शिखराकडे जातांना यशाचे अनेक उंबरठे नेत्रदिपक गुणवत्तेने पार करावे. या सोबतच शिस्त, सामाजिक, नितीमुल्ये, नैतीकता तथा आदर्शाचे वास्तव धडे घ्यावे त्यातूनच सकारात्मक दृष्टीकोनाने उन्नत जीवनाच्या मार्गाने प्रवास करीत असतांना आत्मबळ वाढविण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. — नीलेश ठाकरे संस्थापक अध्यक्ष मथूराबाई ठाकरे चॅरीटेबल ट्रस्ट.