🔸अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.11ऑगस्ट):- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी चिमूर तालुका व्हाईस ऑफ मीडीयाने निषेध करून मारहाण करण्याऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावे असलेल्या निवेदनात संदीप महाजन या पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचे कदापि समर्थन करता येणार नाही, असा उल्लेख आहे. पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मिडीया च्या वतीने निषेध करण्यात आला. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार व त्याच्या कार्यकर्त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच दोषींना कडक शासन करण्यात यावे.
पत्रकार संदीप महाजन यांना न्याय मिळवून देण्याबाबत पूर्ण सहकार्य करावे, लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ किंवा अपमानजनक वक्तव्य पत्रकारांशी करू नये अशी समज आमदार किशोर पाटील यांना आपल्या स्तरावरून देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री शिंदें यांचेकडे केली.
निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात व्हॉइस ऑफ मिडीया चिमूर तालुका अध्यक्ष रामदास हेमके, सचिव भरत बंडे, व्हॉइस ऑफ मिडीया साप्ताहिक विंग चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश डांगे, डिजिटल मीडिया विंग जिल्हा सरचिटणीस श्रीहरी उर्फ बाळू सातपुते, रामदास ठुसे, जिल्हा सदस्य प्रमोद राऊत, योगेश सहारे, विलास कोराम, फिरोज पठाण, उमेश शंभरकर, राम चीचपाले, सुयोग डांगे, योगेश अगडे आदी उपस्थित होते.