Home महाराष्ट्र जोपर्यंत पंतांचा प्रधान असेल, दलित-आदिवासींवर अन्याय अत्याचार होईलच – उमेश मेश्राम

जोपर्यंत पंतांचा प्रधान असेल, दलित-आदिवासींवर अन्याय अत्याचार होईलच – उमेश मेश्राम

67

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि.11ऑगस्ट):-स्थानिक यवतमाळ मध्ये समस्त दलित, आदिवासी,ओबीसी व पुरोगामी विचारांच्या पक्ष संघटना एकत्रित येऊन, मणिपूर येथे सुरू असलेला आदिवासी कुकी/झो व इतर आदिवासी समाज बांधवांवर त्यांची नग्न धिंड काढण्यापासून तर त्यांचेवर सामूहिक बलात्कार करून, अमानुष पद्धतीने त्यांची हत्या करण्याचे शिस्तबद्ध षडयंत्र चालविणाऱ्या येथील भांडवलदारी मनुवादी शासनकर्त्यांच्या विरोधात हजारोच्या संख्येने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात समस्त आंबेडकर राजकीय पक्ष व सामाजिक संघटना सुद्धा प्रामुख्याने समर्थन देत, सहभागी झाल्या होत्या. यावेळी “राष्ट्रीय संवैधानिक हक्क परिषदेचे” संस्थापक प्रमुख उमेश मेश्राम बोलत असताना म्हणाले, “हा भारत देश शूरवीरांचा पराक्रमी योद्धांचा आहे. या देशात सर्व जाती, धर्म, पंथाची लोकं आपापल्या स्वातंत्र्यासह अत्यंत सुरक्षित जीवन जगत असताना, अलीकडच्या काळात मागील मनुवादाची पुनरावृत्ती करणाऱ्या विविध संघटना, पक्ष उदयास आले.

या सगळ्या मनुवादी प्रतिगामी विचारसरणीच्या पक्ष संघटनांना देशातील गलगंड भांडवलदारी लोकांचे समर्थन असून यांना मोठ्या प्रमाणात पैसा पुरवून, जाती धर्म पंथात तेढ निर्माण करण्याचे कार्यक्रम आखून दिलेले आहे. त्याची प्रचिती मणिपूर, हरियाणा व अलीकडच्या काळात महाराष्ट्रात मनोहर कुलकर्णी च्या माध्यमातून होताना दिसत आहे.

अशा परिस्थितीत प्रत्येक राज्यात उग्र आंदोलने झाली.
परंतु त्याला कोणत्याही प्रकारचे सकारात्मक पाऊल येथील मनूवादी प्रतिगामी विचारसरणीच्या शासनकर्त्यांनी उचललेले नाही.

याचा अर्थ असा जोपर्यंत व जेव्हा जेव्हा या देशात पंतांचा प्रमुख या देशाचा प्रधानमंत्री होईल.अर्थात पंतप्रधान होईल तोपर्यंत या देशात दलित, आदिवासी, ओबीसी बहुजनांवर मणिपूर सारखेच अन्याय अत्याचार होत राहील”.

तसेच युवाशक्ती व दारूबंदीच्या आंदोलन चालविणाऱ्या प्रमुख संगीता पवार बोलत असताना म्हणाल्या, “या देशात मातीच्या स्त्री पुतळ्याला मखमली कपडे घातले जातात. परंतु या देशाचे मूळ मालक असलेल्या दलित आदिवासी बहुजनांच्या महिलांना त्यांचे कपडे उतरवून धिंड काढण्याचे पराक्रम येथील वर्णवादी धर्मवादी व्यवस्थेने चालविले आहे.

यांचा मोठ्या प्रमाणात निषेध केला पाहिजे. यांना गादीवरून उतरवून, जमिनीत गाढण्याची वेळ आलेली आहे.यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी महोदय यांना देण्यात आले.

मागण्यांमध्ये प्रामुख्याने, मणिपूर मध्ये असलेले भाजपाचे सरकार बरखास्त केले पाहिजे.तिथे राष्ट्रपती राजवट लावून, एकंदरीत दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत घडलेल्या समस्त घटनांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दोषी असलेले देशाचे मोदी सरकार सुद्धा माननीय राष्ट्रपती महोदय यांनी वटहुकूम आणून बरखास्त केले पाहिजे.जेणेकरून देशात खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाचे राज्य येईल.

यावेळी इतरही आंबेडकर संघटनेचे प्रामुख्याने, भिम टायगर सेना जिल्हाध्यक्ष अजय शेंडे, यूवा विजय धुळे, ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष सचिन खाडे, राज सोनोणे, रितेश मून, वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हाध्यक्षा धम्मवती वासनिक, ऑल इंडिया बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन चे आनंद भगत, समता सैनिक दल यवतमाळ विवेक कांबळे, पीपल्स पॅंथर यवतमाळ जिल्हाध्यक्ष रवीभाऊ वासनिक, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम जिल्हा सचिव नामदेव धूल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा महासचिव गोविंद मेश्राम, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने, अक्षय खोब्रागडे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here