Home महाराष्ट्र देवसरी येथील भगवतीदेवी विद्यालया मध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

देवसरी येथील भगवतीदेवी विद्यालया मध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

192

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 9 ऑगस्ट):- भगवतीदेवी विद्यालय, देवसरी येथे उमरखेड येथील उपजिल्हा उत्तरवार रुग्णालय उमरखेड येथील चमुने (आरबीएसके) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम उमरखेड अंतर्गत डॉ. रचिता दिलीपराव हरण (बी ए एम एस) व रोहन उमेश त्रिपाठी फार्मासिस्ट यांनी विद्यालयातील 237 विद्यार्थ्यांपैकी 200 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

विशेष म्हणजे वर्गआठ ते दहाच्या किशोरवयीन मुलींना एकत्रित करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.रचिता हरण यांनी विशेष मार्गदर्शन केले.

आरोग्य विषयक तपासणीसाठी विद्यालयाचे प्रमुख मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे शिक्षकवृंद गौतम वाठोरेसर दिगंबर मानेसर शेख सत्तारसर राजेश सुरोशेसर भागवत कबलेसर सौ. मीनाताई कदम मॅडम पांडुरंग शिरफुलेसर विष्णू चव्हाणमामा या सर्वांनी सहकार्य केले.व यांची आवर्जून उपस्थिती होती. खेळीमेळीच्या निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here