✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812
सातारा(दि.9ऑगस्ट):- जिल्ह्यातील खटाव तालुक्यात नेर तलावातून, न पवारवाडी वर्धनगड ललगुण नागनाथवाडी येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पाईपलाईन करून लाखो रुपये खर्च करून पाणी नेले आहे. यासाठी इथे बसवलेल्या 40 ते 50 विद्युत मोटारीचे तीन लाख रुपयाच्या किमतीच्या केबल चोरी करून नेले आहे. याबाबत शेतकऱ्यासह भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष धीरज जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याबाबत लवकरात लवकर या चोरट्यांचा तपास लावावा अशी आग्रही मागणी करण्यात आली
आहे.
खटाव तालुक्यातील नेर तलाव हा उत्तर तालुक्यासाठी तसेच तालुक्यासाठी मुख्य जलस्त्रोत मानला जातो यामध्ये पंचक्रोशीतील गावातील ग्रामपंचायत विद्युत मोटारी आहेत विद्युत पंपाच्या केबल मध्ये तांब्याच्या तारा अधिक प्रमाणात असतात बाजारपेठेमध्ये याची किंमत मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नेरतलाव्यासह विविध परिसरात या केबलच्या चोरीच्या संकेत वाढ होत आहे. असे विविध गावातून शेतकऱ्याकडून मिळालेली माहिती आहे. नेर तलावातून शेतीच्या सिंचनासाठी वरील गावामध्ये सात-आठ लोकांच्या सोसायटी बनवून व एकंदरीत लाखो रुपये खर्च करून पाईपलाईन आपापल्या शेतामध्ये ले आहेत या विद्युत मोटारीच्या कनेक्शन साठी दहा ते बारा हजार रुपयाची केबल लागते.
रात्री विद्युत पुरवठा बंद झाल्याच्या काळात व पावसाची सततची झिरमिर याच संधीचा फायदा घेऊन चोरट्याने या शेतकऱ्यांच्या केबल चोरून नेले आहेत. या परिसरात केबल चोरींचे अनेक प्रकार घडले आहेत. लाईट बंद काळात या भागात कोणी जात नसल्याने याचाच फायदा घेऊन लाईट बंद अवस्थेत ही केबल काढणे चोरट्यांना सोपे जात आहे. अशा केवल चोरी गेल्यानंतर शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सदर या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला मिळतात पोलीस स्टेशनच्या वतीने पुसेगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय लोंढे पाटील साहेब, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष धीरज जाधव पवारवाडी चे माजी उपसरपंच संतोष कदम, सचिन पवार नेर, माजी सरपंच विठ्ठल पाचांगणे कैलास जाधव गणेश चव्हाण आणि शेतकरी बांधव यांनी या ठिकाणी पाहणी केली सदर घटनेचा तपास जलद गतीने करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष धीरज जाधव व सहकारी तसेच शेतकऱ्यांनी केली आहे.