Home Breaking News चकलांबा पोलिसांची वाळू तस्करा विरोधात धडाकेबाज कारवाई

चकलांबा पोलिसांची वाळू तस्करा विरोधात धडाकेबाज कारवाई

119

✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.4ऑगस्ट):-पोलिसांची चाहूल लागताच पळवून जाणारा वाळू ने भरलेला एक हायवा व एक ट्रॅक्टर पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

सविस्तर वृत्त असे की चकलांबा ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांनी अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उचलला असून अवैध धंद्यावर जोरदार कारवाई सुरू केल्याचे दिसून येत आहे. काल दिनांक 3/ 8 / 23 रोजी एपीआय नारायण एकशिंगे यांना गोदावरी नदीपात्रात बोरगाव येथे अवैध वाळू उपसा करणार असले बाबत खात्रीशीर बातमी मिळाली होती . त्या अनुषंगाने एक शिंगे यांनी कारवाई कामे टीम पाठवली होती .

काल सुमारे सायंकाळी सात वाजलेल्या सुमारास बोरगाव येथील एक विना नंबर हायवा व स्वराज कंपनीचे विना नंबर ट्रॅक्टर ट्रॉली सह अवैध वळ वाहतूक करताना मिळून आले असता त्यांना पोलीस पथकाने थांबण्याचा इशारा केला असता ते न थांबता पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचा ड्रायव्हर ताब्यात घेतला परंतु हायवा चा ड्रायव्हर हायवा सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला. मिळून आलेले हायवा व ट्रॅक्टर सह ड्रायव्हर पोलीस ठाणे येथे घेऊन येऊन त्यांच्या विरोधात पथक प्रमुख पीएसआय इंगळे यांनी चकलांबा पोलीस स्टेशन येथे गुरन क्रमांक 224/23 भादविस कलम 379,34 प्रमाणे फिर्याद दाखल करून पुढील तपास पोह गुजर हे करत आहेत.

काल पळून गेलेला हायवा ड्रायव्हर पकडण्यात पोलिसाला यश आले असून त्यासही पोलिसाने अटक केली आहे. त्यामध्ये ट्रॅक्टर ड्रायव्हर ज्ञानेश्वर उर्फ माऊली कोंडीराम भोसले राहणार मुंगी तालुका शेवगाव व हवा ड्रायव्हर फयास गुलाब शेख राहणार बोधेगाव तालुका शेवगाव असे अटक आरोपींची नावे आहेत.सदर कारवाई मध्ये 18 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब बीड नंदकुमार ठाकूर साहेब, अपर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई नीरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे,पीएसआय इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल /तुकाराम पवळ, पोलीस कॉन्स्टेबल / सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल / कैलास खटाणे यांनी केली असून सदर कारवाईची अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांनी चांगलाच धसका घेतला आहे. सदर कारवाईबाबत चकलांबा पोलिसांचे कौतुक होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here