Home अमरावती प्रा राम मेघे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वृक्षरोपण कार्यक्रमाला जापानीज शिष्टमंडळाचा उत्स्फूर्त...

प्रा राम मेघे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वृक्षरोपण कार्यक्रमाला जापानीज शिष्टमंडळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

86

 

बडनेरा येथील विदर्भ युथ वेलफेयर सोसायटी द्वारा संचालित प्रा. राम मेघे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय येथे महाविद्यालय परिसरात भव्य वृक्षारोपण करण्यात आले. विविध आदर्श सामाजिक उपक्रमांबद्दल नेहमी चर्चेत असलेले हे महाविद्यालय आहे. संस्थेचे पदाधिकारी व महाविद्यालयीन प्राचार्य यांच्या उत्स्फूर्थ कल्पनेतून मागील चौदा वर्ष्यांपासून महाविद्यालय सामाजिक जाणीव ओळखून दरवर्षी वृक्षारोपण करत असते व ते वृक्ष जगवतात म्हणूनच तर आज महाविद्यालय परिसर हिरवा शालू नेसून डौलाने डोलत आहे. दिनांक ०२ ऑगस्ट २०२३ रोजी महाविद्यालय परिसरात भव्य वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे औचीत्त्य साधून महाविद्यालयात प्राचार्यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रीय सेवा योजना तर्फे १०० वृक्षारोपण व स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम घेण्यात आला.विशेषता कार्यक्रमाला जपान मधून आलेले शिष्टमंडळ सुद्धा सहभागी झाले,तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षेत्तर कर्मचारी व रासेयो च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्स्फूर्थ प्रतिसाद दिला. या वृक्षारोपणा अंतर्गत कडू लिंब, कडू बदाम, पिंपळ, वड ,पिंपळ,फणस ,आंबा ई. वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व अनुभवी प्राध्यापक वर्ग समेत रासेयो विद्यार्थी तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम कदम, महिला कार्यक्रम अधिकारी गायत्री बहिरे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. अतुल डहाणे ,प्रा. विजय खंडार, प्रा.किशोर ढाके,प्रा. अपर्णा खैरकर,प्रा.आशिष सायवान व क्रीडा विभाग संचालक डॉ. नवीन विघे यांनी व रासेयो स्वयंसेवक सुरज मुंढे ,मिताली पकडे ,अमन खंडारे,तेजस भोरे ,प्रथमेश सवाई ,जान्हवी ठाकरे,सार्थक बंते ,तनुजा खोब्रागडे अनुराधा भोरे समय तातेड व समस्त विद्यार्थ्यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे मा. अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, मा. उपाध्यक्ष अॉडव्होकेट उदयजी देशमुख, मा. कोषाध्यक्ष प्रा. हेमंतजी देशमुख, मा. सचिव श्री. युवराजसिगजी चौधरी, सन्माननिय सदस्य मा. श्री. शंकरराव काळे, मा. श्री. नितीनजी हिवसे, मा. सौ. रागिनीताई देशमुख, मा. डॉ. सौ. वैशालीताई धांडे व मा. डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here