✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 2 ऑगस्ट):-महसूल सप्ताह निमित्ताने गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील एन.एस.एस विभाग व तहसील ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल सप्ताह निमित्त कार्यक्रम व करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.
याप्रसंगी मा. श्री. व्यंकट राठोड (उपविभागीय अधिकारी) यांनी महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल विभागाबद्दलची माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली व त्यासोबतच विभागातील वेगवेगळ्या योजना विद्यार्थ्यांना सांगितल्या व करिअर कसे घडवावे अभ्यास कसा करावा याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमादरम्यान वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.
करियर मार्गदर्शन कार्यशाळेसाठी श्री सुमित विठ्ठलराव पतंगे याच महाविद्यालयात विद्यार्थी होते यांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आता टॅक्स असिस्टंट म्हणून नेमणूक झाली आहे, त्यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन केले अभ्यास कसा करावा प्रश्न कशा प्रकारचे येतात व कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी द्याव्यात याबद्दल मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा.कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व तसेच मा. श्री. व्यंकट राठोड (उपविभागीय अधिकारी) यांना सर्वकृष्ट उपविभागीय अधिकारी हा अवार्ड मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.
संपूर्ण कार्यक्रमासाठी पाठबळ व शुभेच्छा व मार्गदर्शन यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज, यवतमाळ संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.रामसाहेब देवसरकर व सचिव माननीय श्री. डॉ. यादवराव राऊत साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा.कदम यांनी दिले.
या प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालय रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पी.वाय.अनासने, महिला सहा कार्यक्रमाधिकारी प्रा.ए. पी.मिटके मॅडम, प्रा. डॉ. बी.एम. सावरकर, प्रा. डॉ. प्रवीण सरपाते, श्री दीपक पोपुलवाड व तहसील ऑफिस उमरखेड येथील अधिकारी प्रशांत कावरे निवासी नायब तहसीलदार, संदिप घाडगे सेतू संचालक, वसंत बोदगिरे निवडणूक विभाग व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा. ए. एस. जोशी यांनी केले, कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी केली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्ही. एस. इंगळे यांनी केली व कार्यक्रमाची सांगता झाली.