🔹विद्यार्थ्यांचे दाखले शिबिराच्या माध्यमातून देऊ – लक्ष्मण सातपुते
🔸आजचा तरुण उद्याच्या देशाचे भविष्य – सी.बी.देवराज
✒️पी. डी.पाटील सर(धरणगांव प्रतिनिधी)
धरणगांव(दि.2ऑगस्ट):- आज रोजी शहरातील बालकवी ठोंबरे व कुडे माध्यमिक विद्यालयात महसूल विभागामार्फत महसूल आठवडा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात लक्ष्मण सातपुते निवासी नायब तहसिलदार तसेच पी.डी.पाटील (BLO) यांनी महसूल सप्ताह दिनानिमित्त युवा संवाद कार्यक्रमांतर्गत युवकांना निवडणुकीविषयी मतदार नाव नोंदणी, जनजागृती, विविध शासकिय योजना, दाखले, कागदपत्रांची विस्तृत माहिती दिली.
तसेच इच्छाकृपा कम्प्युटर च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना डोमेशियल, नॅशनॅलिटी इत्यादी सर्टिफिकेट माफक दरात काढून मिळेल ,अशी ग्वाही कम्प्युटरचे संचालक यांनी दिली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. मतदार मतदार नोंदणी फॉर्म भरण्यात आले. कार्यक्रमात मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील, पिंटू भाऊ, संतोष बारेला (BLO) , ए.डी.पाटील व आर.डी.महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री ए.एच.पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.