अमरावती :
. स्थानिक फुले ,शाहू, आंबेडकरी संघटनेच्या वतीने दि . १ ऑगस्ट २०२३ ला साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 103 वा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड, प्रमुख वक्ते प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले (अध्यक्ष कै . मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान ), प्रमुख अतिथी प्राचार्य टी. एफ. दहिवाडे (अध्यक्ष,तथागत बुद्धभूमी संस्था अमरावती )हे होते.
अध्यक्षीय भाषणातून समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड म्हणाले की , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी साहित्य व शाहिरीतून मानवमुक्तीसाठी दिलेला लढा हा सकलांना सदैव प्रेरणा देणारा आहे. त्यांनी सामाजिक विषमतेवर प्रहार केले. अनिष्ट रूढी,परंपरा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न केले, विषमताधिष्ठित समाज व्यवस्थेविरुद्ध क्रांती करण्याचा संदेश दिला .”
प्रमुख वक्ते अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी, ” साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे भारतातील असे साहित्यिक आहेत की ज्यांचे लिखाण जगातील एकूण 27 भाषेत भाषांतरित झाले आहे, त्यांच्या साहित्यावर भारतातील हजारो विद्यार्थ्यांनी पीएचडी केलेली आहे.अण्णाभाऊंनी घामाच्या प्रतिष्ठेसाठी लढा पुकारला होता. आयुष्यभर त्यासाठी झुंज दिली आणि मुक्तीच्या लढ्याचे नायक झाले.”असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री शिवभाऊ देहाडे तर आभार श्री ओम दिलीप देहाडे यांनी मानले .
कार्यक्रमाला सर्वश्री सतीश खडसे, चंद्रशेखर गुप्ता,प्रवीण खंडारे, संजूभाऊ बांगल,मंदाताई ससाने, महेंद्र डोंगरे,सोहन इंगोले, दिलीप देहाळे, कृष्णा ससाने,अशोक हिवराळे, जितेंद्र इंगोले, दिगंबर तायडे व अमृता इंगोले यांची उपस्थिती होती.