✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
🔺आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी प्रांताधिकारी यांना निवेदन!!
म्हसवड(दि.1ऑगस्ट):-मणिपूर मध्ये सुरू असलेली दंगल ,जाळपोळ व महिलांच्यावर केलेला अत्याचार याचा निषेध करून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी,माण च्या वतीने मा. प्रांत मॅडम,तहसीलदार माण, मा.सहायक पोलीस निरीक्षक याना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की मणिपूर येथील मैतई या उच्च हिंदू जातीला आदिवासी चा दर्जा द्यावा ही मागणी आहे परंतु कुकी,नागा या खऱ्या आदिवासी जमाती ज्या डोंगरावर राहत आहेत त्या डोंगरखाली असणारी गौण खनिजे भांडवलदार यांच्या घशात घालण्यासाठी या जमातींना तेथून हाकलून लावण्यासाठी सरकारच्या पाठिंब्याने जाणीवपूर्वक घडवून आणलेली ही दंगल आहे.
कुकी जमातीतील दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली त्यांच्या देहाची विटंबना केली ही माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट आहे .ब्राह्मणी भांडवली धर्मांध शक्तीच्या क्रूरतेचा हा कळस असून पोलिसांसमोर घटना घडून सुद्धा आरोपींवर तात्काळ कारवाई होत नाही देशाचे पंतप्रधान यावर काही बोलत नाहीत यावरुन भाजप सरकारच यास जबाबदार आहे असे दिसून येत आहे या सर्व घटनेचा माण तालुका वंचित बहुजन आघाडी तीव्र निषेध करीत असून माणिपूचे भाजप मुख्यमंत्री एन विरेन सिंह व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करीत आहोत
निवेदनावर तालुका अध्यक्ष युवराज भोसले,युवक जिल्हाध्यक्ष सनी तुपे,सरचिटणीस बजरंग वाघमारे,सल्लागार मधुकर खरात,शहराध्यक्ष राजेंद्र आवटे,उपाध्यक्ष संतोष पारसे,सचिव विक्रम जगताप,संघटक महेंद्र भोसले, दादासो शिनगारे,अमर भोसले,बाळासो पवार,सिद्धार्थ भोसले यांच्या सह्या आहेत