जिल्हा प्रतिनिधी/सिध्दार्थ दिवेकर
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौध्द महासभा यवतमाळ जिल्हा पश्चिम चे वतीने गुणवंत विद्यार्थी व चिंतन शिबिराचे आयोजन दि. 31/7/2023 ला बोधिसत्व बुध्द विहारात करण्यात आले होते.
सर्वप्रथम तथागत भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पुजन पुष्पहाराने मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करुन करण्यात आले. आणि सामुहिक त्रिसरण पंचशील वंदना घेतली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष,रवि भगत, मार्गदर्शक व्हि.पी पाटील, प्रमुख अतिथी विठ्ठलराव मनवर मंगरुळपीर राहुल राऊत, कोषाध्यक्ष, अँड.गोविंद बन्सोड उपाध्यक्ष ,ललित बोरकर उपाध्यक्ष, मोहन भवरे तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन भवरे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक व्हि.पी.पाटील मार्गदर्शन म्हणाले ग्रीक देशांत डेमोफुन ला निखा-यावर भाजुन दणकट केले तसे गुणवंत विद्यार्थी यांनी उच्च ध्येय साधण्यासाठी प्रयत्न करुन स्वत:ला सिध्द केले पाहिजे. रुपेश वानखडे यांनी “मिशन BSI व संघटन बांधणी”या विषयावर भाष्य केले. रवि भगत जिल्हाध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषण केले.
इयत्ता 10 वी व 12 वी च्या गुणवंत विद्यार्थी यांचे व देणगीदाते यांचा सत्कार करण्यात आला. MBBS च्या 4 मुलींचा सत्कार करण्यात आला.
कपील बन्सोड यांचे वाढदिवसानिमित्य अरुणाताई व गोविंद बन्सोड यांनी दहा हजाराचे सन्मानचिन्ह देण्यात आले. उषाताई व अरुण खंडारे यांनी 10000/- ,प्रदिप रामटेके यांनी 5000/- इतर 10000/-असे 25000/- हजाराचे दान विहाराचे बांधकामासाठी जमा झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुपेश वानखडे यांनी केले.तर उषाताई खंडारे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास जिल्हा व सर्व तालुका शाखेचे शाखेचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षिका,केंद्रिय शिक्षक,बौध्दाचार्य ,गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.