Home गडचिरोली राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे राष्ट्रीय महाअधिवेशन ७ ऑगस्टला 🔹तिरुपती येथे...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे राष्ट्रीय महाअधिवेशन ७ ऑगस्टला 🔹तिरुपती येथे होणार महाअधिवेशन. 🔹गडचिरोली जिल्ह्यातून ३०० प्रतिनिधी उपस्थित.

126

 

गडचिरोली ( चक्रधर मेश्राम) l

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठवे राष्ट्रीय महाअधिवेशन महती आडीटोरियम बालाजी कॉलनी, तिरुपती, आंध्र प्रदेश येथे सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न होणार आहे.
या महाअधिवेशनाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नामदार वाय.एस .जगनमोहन रेड्डी करणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी, आंध्र प्रदेशचे मागासवर्गीय कल्याण मंत्री चेलू बोईना वेणू गोपाल कृष्णा, तेलंगणाचे मागासवर्गीय कल्याण मंत्री गणगोला कमलाकर , आंध्र प्रदेशच्या महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती के .व्ही.उषाश्री, तेलंगणाचे खासदार व AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री परिणय फुके, माजी मंत्री महादेवराव जानकर, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकरराव अडबाले, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुरकर उपस्थित राहणार असून अधिवेशनाची भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे मांडणार असून, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही. ईश्वरय्या बिज भाषण करणार आहेत. डॉ. अशोक जीवतोडे कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवणार आहे.
दुपारच्या सत्राचे अध्यक्ष पद तेलंगणा व आंध्र प्रदेश डीसीएल वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजूला श्रीनिवास गौड राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून वीरेंद्र सिंग यादव माजी न्यायमूर्ती अलाहाबाद हायकोर्ट, तेलंगणाचे खासदार वडी राजू रविचंद्र, खासदार गोपी देवी वेंकटरमन्नाराव, खासदार नबाकुमार सराबीया, सिने अभिनेता सुमन तलवार, माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंद्रजीतसिंग उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात ओबीसींची जात निहाय जनगणना या प्रमुख मागणीसह ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत २७% किंवा देशातील ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लागू करणे, स्वतंत्र केंद्रीय ओबीसी मंत्रालयाची स्थापना करणे, सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाने घातलेली 50 टक्के आरक्षणाची मर्यादा दूर करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी, क्रिमिलेयरची असंविधानिक अट रद्द करावी.,ओबीसी समाजातील शेतकऱ्यांना वन हक्क पट्टे देण्यासाठी तीन पिढ्याची अट रद्द करावी , ओबीसी मुला मुलींना प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह व स्वाधार योजना सुरू करण्यात यावी यासह इतर 42 मागण्यांचे संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या अधिवेशनाला गडचिरोली जिल्ह्यातून ३०० ओबीसी प्रतिनिधी हजर राहणार आहेत.यापैकी १०० ओबीसी कार्यकर्त्यांची पहिली फळी ३० जुलै रोजी गडचिरोली वरून तिरूपती साठी रवाना झाली. २०० ओबीसी समाज बांधव आणि कार्यकर्ते ५ ऑगस्ट ला रवाना होणार आहेत.
या व्यतिरिक्त गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यातून ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने महा अधिवेशनाला हजर राहण्याच्या आव्हान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चूधरी, कार्याध्यक्ष विनायक बांदुरकर, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर सचिव देवानंद कामडी, संघटक सुरेश भांडेकर ,चंद्रकांत शिवणकर, शंकर चौधरी, युवा उपाध्यक्ष राहुल भांडेकर, महिला जिल्हाअध्यक्ष संगीता नवघडे, गडचिरोली शहराध्यक्ष सोनाली पुण्यपवार ,महिला संघटक सुधा चौधरी,ज्योती भोयर , मंगला कारेकर, सौ पुष्पा धंदरे, ,विद्या म्हशाखेत्री, दादाजी चापले, विधितज्ञ संजय ठाकरे, प्राचार्य जयंत येलमुले, मुकुंद म्हशाखेत्री,जगदीश लडके, विजय गिरसावळे, राजेंद्र उरकुडे,पांडुरंग नागापुरे, किरण कारेकर, कमलाकर रडके , रामकृष्ण ताजने, शालिकराम डोंगे, रमेश पत्रे, मुखरू आभारे इत्यादींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here