🔹ना. सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम व उपक्रमाने साजरा
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830
चिमूर(दि.30जुलै):-चिमूर जिल्हा घोषित करण्यात यावा प्रमुख मागणीचे निवेदन पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती चिमूर तालुका भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर यांनी चिमूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री,वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कार्यकर्त्यांनी चिमूर येथे उपजिल्हा रुग्णालय यामध्ये रुग्णांना फळ वाटप व वृक्षारोपण केले.
यावेळी रुग्णांना त्यांच्या आरोग्याची आस्थेने विचारपूस करून काळजी घेण्याचे सांगितले. वनविभाग व पोलीस स्टेशन परिसरामध्ये वृक्षारोपण, शहरात स्वच्छता मोहीम, राष्ट्रसंत मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांना ना.सुधीर मुनगंटीवार यांचे जीवन व कार्याचा परिचय करून देताच “भाऊंना आम्ही ओळखतो…”असे बोलून विद्यार्थ्यांनी प्रतीसाद दिला. अशा प्रकारे विविध कार्यक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला. चिमुर क्रांती जिल्हा निर्माण करावा या प्रमुख मागणीसह असंख्य मागणीचे निवेदन पालकमंत्री यांना देणार असल्याची माहिती भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये असंख्य पदाधिकारी तथा कार्यकर्त्यां सह पत्रकार परिषदेतून दिलेली आहे.
पत्रकार परिषदेला भाजपा चिमूर तालुका माजी अध्यक्ष डॉक्टर दिलीप शिवरकर, जिल्हा परिषद माजी सदस्य विजयकुमार घरत, विवेक कापसे, विनोद अढाल, ज्ञानेश्वर शिरभय्ये, बंडू बघेल, विलास मेहरकुरे, पुंडलिक मत्ते, मनीष नाईक, नागनाथ फुलझेले, अवि बावनकर, सुभाष मोहीनकर, बालाजी मोहीनकर, दशरथ खोबरे, सुरेश बैनलवार, गजेंद्र चांदेकर, पठाण सर, विलास वरभे, मनोज हजारे , मनोज वनमाळी, मधुकर जांभूळकर, राजू नन्नावरे , एड. विलास मोहुर्ले, शिवरकर टेलर्स, महेश नन्नावरे , यश शिरभय्ये, अजय मोहिनकर, तिलक बागडे व अन्य भाजपा ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवरकर पुढे म्हणाले, चिमुर क्रांती जिल्हा निर्माण व्हावा याकरिता मागील पन्नास वर्षापासून अनेकदा निवेदने, आंदोलने झाली, त्यावेळी सुद्धा पालकमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी जिल्ह्याच्या मागणीचा पाठपुरावा केलेला होता . त्यामुळे आम्ही त्यांच्याच माध्यमाने जिल्ह्याची मागणी शासन दरबारी करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून दिलेली आहे.
——–
मूकबधिर विद्यालयाला फिल्टर व श्रावण यंत्र देण्यात यावे-मुख्याध्यापक कामडी
भारतीय जनता पक्षाचे वतीने ना. सुधीर मुनगंटीवार यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने मिठाई वाटप कार्यक्रम दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी मूक-बधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शुद्ध पाणी शुद्धीकरण मशीन व वैयक्तिक ३३ श्रवण यंत्र शाळेकरीता देण्यात यावी अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मुख्याध्यापक रामदास कामडी यांनी केली, ना.मुनगंटीवार यांचेकडे शाळेच्या विविध मागण्यांसाठी भाजप चिमूर तालुक्याच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. दिलीप शिवरकर व कार्यकर्त्यांनी दिली.