Home महाराष्ट्र अभंग-साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे

अभंग-साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे

149

स्मरतात आज । थोर साहित्यिक ॥
कीर्ती जागतिक । अण्णाभाऊ ॥ १ ॥

अण्णाभाऊ साठे । साहित्य अक्षर ॥
समता विचार । लेखनीचा ॥ २ ॥

प्रेरणेचे स्थान । कष्टकरी प्रजा ॥
कामगार राजा । दूरद्रष्टा ॥ ३ ॥
.
लावियले नाही । पाख कल्पितांचे ॥
भान वास्तवाचे । सदोदित ॥ ४ ॥

समता नि न्याय । ज्योत संघर्षाची ॥
लेखनी भाऊंची । उजळली ॥ ५ ॥

साहित्यसम्राट । वास्तवाची धार ॥
लेखनीने वार । दंभावर ॥ ६ ॥

जन्मदिनी आज । करितो नमन ॥
करांनी वंदन । कोटी कोटी ॥ ७ ॥

✒️अभंगकार:-प्रा अरुण बाबारावजी बुंदेले(रुक्मिणी नगर,अमरावती)भ्रमणध्वनी:-८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here