✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.31जुलै):-परिवार जोडो संपर्क अभियान कौटुंबिक कलह दूर झाल्यास वाढतो स्नेह. समाजात कौटुंबिक कलहाचे प्रकार वाढत आहे पत्नी कायद्याचा गैरवापर करून तर कधी कायद्याचा धाक दाखवून पती व सासरच्या मंडळींना वेटीस धरतात त्यामुळे अनेक परिवार पीडित आहे अशा एकमेकापासून दुरावलेले परिवार कसे वाचविता येईल याकरिता चंद्रपुरातील परिवार बचाव संघटने कडून परिवार जोडो अभियान राबविण्यात येत आहे.
एकमेकापासून दुरावलेल्या हजारो कुटुंबांना समुपदेशनातून एकत्र आणले जात आहे. परिवार जोडो अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर, सचिव सुदर्शन नैताम, मोहन जीवतोडे, वसंत भलमे,प्रदीप गोविंदवार, सचिन बरबटकर, सुभाष नरुले, गंगाधर गुरणुले पिंटू मुन स्वप्निल सूत्रपवार, विनोद करमरकर, प्रशांत मडावी, दिलीप शेंडे, ऍड सारिका संदुरकर, नितीन घाटकिने,अड धीरज ठवसे आदी हा उपक्रम मागील काही वर्षापासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. संयुक्त कुटुंबाचा काळ अगदी आनंदात गेला आता विभक्त कुटुंब पद्धती आली यात कौटुंबिक वाद पराकोटीला जात आहे अशा कुटुंबावर वडीलधाऱ्यांचा धाक राहिलेला नाही.तरुण पिढी पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करून विनाशाकडे जात आहेत. असे निरीक्षण डॉ. मैंदळकर यांनी नोंदविले.
कौटुंबिक वादात सासर व माहेर दोन्ही अधोगतीला जात आहेत. समाज व कुटुंबाचे नुकसान होऊ नये याकरिता पती-पत्नी सासर माहेर यांच्यात कसा समन्वय घडवून आणता येईल दोन्ही पक्षाचे समुपदेशन करून कुटुंब परिवारात स्नेह व आनंद निर्माण व्हावा याकरिता भारतीय परिवार बचाव संघटने कडून परिवार जोडो संपर्क अभियान राबविण्यात येत आहे या संघटनेचे सर्व सदस्य या सामाजिक कार्यास स्वयंपूरतीने सहभाग घेत आहेत. कुटुंबात वाद होणे पति व पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होण्यासाठी मोबाईल मुख्य भूमिका वटवीत असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच मुलीच्या संसारात आईने व वडीलाने ढवळाढवळ करणे तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे घटस्फोटाचे प्रमाणही वाढत आहे.
पती-पत्नीच्या भांडणात मुलांचे भविष्य अंधकारमय होते पुरुषांच्या माता-पित्यांना वृद्धाश्रमात राहायची वेळ येत आहे. घरातील भांडणामुळे भाऊ वहिनी बहिण भाऊजी आई-वडील नणंद भावजय या कुटुंबातील मधुर संबंध कटू होत आहे. कुटुंबात कलह निर्माण होण्याचे आर्थिक शारीरिक लैंगिक व राजकीय कारण असू शकते यातून कुटुंब उध्वस्त होत आहेत. नवऱ्याला, जावयाला सरळ करू या अविर्भावात राहून महिला कायद्याचा गैरवापर करीत आहे. परंतु आता जावई पण उदंड झाले आहेत. लक्षात घ्यायला पाहिजे डॉ नंदकिशोर मैंदळकर यांनी म्हटले आहे.