✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 31जुलै):- शहरातील मुख्य मार्केट मध्ये माहेश्वरी चौक जवळील केसर मोबाईल गॅलरी रात्री सराईत गुन्हेगारांनी फोडून त्यामधील 15 ते 20 महागडे व चांगल्या कंपनीचे मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले आहे.
मध्य मार्केटमध्ये असलेले केसर मोबाईल गॅलरी हे दुकान काल मध्यरात्री चोरट्यांनी फोडून या दुकानातले विविध चांगल्या कंपनीचे मोबाईल चोरट्याने लंपास केले आहे हे गुन्हेगार सराईत असून त्यांचा शोध मराठवाड्यात पोलीस करत आहेत अशी प्राथमिक माहितीकेशर मोबाईल गॅलेरी मिळाली आहे.
केसर मोबाईल गॅलरी चे प्रोप्रायटर प्रशांत मुक्कावार हे असून त्यांनी सदर माहिती दिली आहे पुढील तपास उमरखेडचे ठाणेदार पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय देशमुख, एपीआय सरदार, संतोष राठोड, संदीप ठाकूर हे करीत आहे.