Home महाराष्ट्र पांढरकवडा येथे चिंतन शिबीर व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

पांढरकवडा येथे चिंतन शिबीर व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

178

✒️जिल्हा प्रतिनिधी(सिध्दार्थ दिवेकर)

यवतमाळ(दि.31जुलै):- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या अंतर्गत तालुका शाखा पांढरकवडा यांच्या वतीने एक दिवशीय चिंतन शिबीर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तथा पाली भाषा प्रमाणपत्र वितरण सोहळा दि.३०जुलै २०२३रोजी ज्ञानदीप बुद्धविहार येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.अण्णा मुन हे उपस्थित होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डाँ.उत्तम शेंडे (बौध्दाचार्य ), नरेन्द्र भगत (पुर्व विभाग संस्कार प्रमुख) शांतीदुत मुळे ( उपाध्यक्ष पर्यटन व प्रचार), वासुदेव शेंद्रे, प्रा. डॉ. राहुल दखणे, परमेश्वर भरणे ( संघटक, समता सैनिक दल) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यामध्ये १४ विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद रामटेके व सूत्रसंचालन प्रा. संघरत्ना आठवले यांनी केले तर किशोर भाटशंकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता फुलमाळी सर, वंदना बागेश्वर, रमेश भगत ,दिनेश लढे यांनी परिश्रम घेतले. यावेळी कपिल दगडे, उत्तम काळे, डाँ.नरेन्द्र खैरे, गणपतराव डोंगरे, अंबादास दवलकर यांच्यासह असंख्य धम्म बांधव व भगीनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here