Home महाराष्ट्र शब्दगंध संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार संग्रामभैया जगताप

शब्दगंध संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार संग्रामभैया जगताप

169

✒️अहमदनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहमदनगर(दि.30जुलै):-शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.आयुर्वेद महाविद्यालयातील सभागृहात शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांच्या निवडीचे पत्र मार्गदर्शक ज्ञानदेव पांडुळे व प्राचार्य डॉ.जी पी.ढाकणे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

यावेळी हमाल पंचायत चे अध्यक्ष अविनाश तात्या घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, प्रा. मेधाताई काळे, चंद्रकांत पालवे, मसपा चे जयंत येलुलकर, दैनिक पुढारी चे आवृत्ती प्रमुख संदीप रोडे, दैनिक लोकमंथन चे मुख्य उपसंपादक श्रीराम जोशी, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे,डॉ.श्याम शिंदे, प्राचार्य विश्वासराव काळे,जालिंदर बोरुडे, सुरेश मिसाळ, राजेंद्र चोभे यांच्या प्रमूख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

पुरोगामी विचारांच्या व विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असणाऱ्या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक कवींना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी सुरू झालेल्या शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबवण्यात येतात. यामध्ये कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद,चर्चासत्र, कथा व काव्य लेखन स्पर्धा, विविध पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात. वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे व साहित्यिक देवाण-घेवाण व्हावी यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते, यापूर्वी शब्दगंध च्या वतीने १४ राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यावर्षी सर्वानुमते नगर शहराचे लाडके आमदार संग्रामभैया जगताप यांची सर्वानुमते स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली व त्यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार संग्रामभैय्या जगताप म्हणाले की, पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी मी सर्वानुमते स्वीकारत आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्याने शब्दगंधचे १५ वें साहित्य संमेलन १४ संमेलनापेक्षा आगळे,वेगळे व भव्य दिव्य असे आयोजित करण्यात येईल. राज्यात उत्कृष्ट साहित्य संमेलन करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करू या. शब्दगंध साहित्य संमेलनाबद्दल गेल्या पंधरा वर्षापासून वाचत, ऐकत व अनुभवत आलेलो असून शब्दगंध ही नवोदित साहित्यिकांना पुढे आणणारी चळवळ आहे, नव्या पिढीवर चांगले साहित्य संस्कार होण्यासाठी शब्दगंधचा नेहमीच प्रयत्न असतो, तो प्रयत्न आपण कधीही खंडित होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक केले. शब्दगंध चे मार्गदर्शक ज्ञानदेव पांडुळे यांनी स्वागताध्यक्षपदाची सूचना केली तर अविनाश तात्या घुले यांनी त्यास अनुमोदन दिले, यावेळी मसापचे प्रतिनिधी जयंत येलुलकर, चंद्रकांत पालवे, प्रा. मेधाताई काळे, प्राचार्य जी.पी. ढाकणे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, पत्रकार श्रीराम जोशी, राजेंद्र चोभे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ज्ञानदेव पांडुळे यांनी शुभेच्छा दिल्या. तर भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी आभार मानले.
बैठकीस पै. नाना डोंगरे, विनायक पवळे, पी. एन. डफळ, लेविन भोसले, मृणाल गोडांबे, बबनराव गिरी, स्वाती ठुबे, सरोज अल्हाट, शर्मिला गोसावी, आरती व सत्यप्रेम गिरी, सुरेखा घोलप, श्यामा मंडलिक, सुनील धस, देविदास अंगरख, गोरक्षनाथ गवळी, कृष्णकांत लोणे, संतोष कानडे,व्ही. एन.भोईटे, डॉ.तुकाराम गोंदकर, सुनील गुगळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऋषिकेश राऊत,दिशा गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here