✒️भिसी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
भिसी(दि.30जुलै):- मागील 20 वर्षापासुन चिमूर तालुक्याचे विभाजन करून भिसी तालुका निर्माण करावा, म्हणून स्थानिक सर्वपक्षीय नेते, नागरिक, व्यापारी असोसिएशन तर्फे स्वयंस्फूर्तीने साखळी उपोषण आमरण उपोषण व भिसी बाजारपेठ बंद ठेवून आंदोलने केली.
शासनाकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अनेकदा निवेदने देण्यात आले होते तेव्हा पाच वर्षे अगोदर तालुक्याची मागणी असताना सुद्धा अप्पर तालुका देण्यात आला मात्र या या ठिकाणी पूर्णवेळ स्थायी तहसीलदार व अधिकारी कर्मचारी नसल्यामुळे भिशी व परिसरातील नागरिकांचे कोणतेही प्रशासकीय कामे होत नाही नाममात्र अप्पर तालुका असल्याने नागरिकांना शासकीय कामाकरिता चिमूरला जावे लागते.
त्यामुळे भिसी व्यापारी मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये भिसीला पूर्ण तालुक्याचा दर्जा द्यावा असा ठराव घेण्यात आला. त्या अनुषंगाने भिसी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष धनराज मुंगले यांनी 16 ऑगस्टपर्यंत भिसीला पूर्ण तालुक्याचा दर्जा द्यावा, अन्यथा सर्वपक्षीय नेते, नागरिक, व व्यापारी त्रिव्र आंदोलन करणार असा इशारा घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.
भिसी तालुका निर्माण व्हावा यासाठी वीस वर्षांपूर्वी सतत एक महिना साखळी उपोषण, पंधरा दिवस आमरण उपोषण, पंधरा दिवस सतत बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते. या संबंधित तत्कालीन आमदारांनी विधानसभा व विधान परिषदेच्या सभागृहामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन महसूलमंत्र्यांनी भिसीला तालुका देण्याचे आश्वासन दिलेले होते. मात्र शासनाने भिसीला अपर तालुका देऊन भिशीवासीयांचे तालुका मागणीचे स्वप्न धुळीस मिळविले.
अप्पर तहसील ने जनतेचे कामे होत नाही. पूर्ण तालुका झाला तर जनतेची कामे पूर्ण होतील .गावाच्या विकासात भर पडेल. भिसी तालुका मिळवण्यासाठी मंत्र्याकडे सर्वपक्षीय नेते मंडळींना भेटण्यासाठी वेळ आल्यास मी स्वतः पुढाकार घेणार , तेव्हा 16 ऑगस्ट पूर्वी पूर्ण तालुक्याचा दर्जा द्यावा. अन्यथा सर्वपक्षीय नेते , नागरीक, व्यापारी आंदोलन करणार असा इशारा भिसी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष धनराज मुंगले यांनी पत्रकार परिषदेतून दिलेला आहे . पत्र परिषदेत धनराज मुंगले, मधुकर मुगले, घनश्याम येरुंनकर उपस्थित होते.